30 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) विकले:
आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) विकले:

30 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 जुलै 2020)

आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) विकले:

 • खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एडचीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी स्वत:चे 95 टक्के शेअर्स (समभाग) मागील आठवड्यामध्ये विकले आहेत.
 • यामधून आदित्य पुरी यांनी 843 कोटी रुपये मिलाले आहेत. आदित्य पुरी यांनी त्यांच्याकडे असणारे एचडीएफसीचे 74.2 लाख शेअर्सची विक्री केली आहे.
 • पुरी यांच्याकडे एचडीएफसीचे 77.96 लाख शेअर्स होते. पुरी यांना आर्थिक वर्ष 2020 साठी 6.82 लाख ईएसओपीच्या माध्यमातून मिळाले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2020)

अमेरिकेत करोना बाधितांची संख्या 45 लाखांवर:

 • जभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसल्याचं दिसत आहे.
 • तसंच अमेरिकेतील करोनाबिधितांच्या संख्येनं 45 लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती समोर आली.
 • तर दुसरीकडे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत करोनामुळे तब्बल दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहितीदेखील समोर आली.
 • अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 53 हजार 447 जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत 1 हजार 267 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 हजार नव्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे.

34 वर्षांनंतर शिक्षणाचा नवा अध्याय:

 • तब्बल 34 वर्षांनंतर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 • शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले असून दहावी आणि बारावी या बोर्डाचे महत्त्व आता कमी होणार आहे.
 • शालेय शिक्षणाची रचना 10 + 2 ऐवजी 5+3+3 +4 अशी झाली आहे. आता सहावीनंतर व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल; तर 5 वी पर्यंत मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य असेल.
 • एकाचवेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येईल.
 • शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जाणार असून 21 व्या शतकासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याला महत्त्व देण्यात आले आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे:

 • करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने लॉकडाउन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे.
 • केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘अनलॉक 3’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत.
 • यामध्ये नाइट कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी शाळा, कॉलेज आणि कोचिंगसारख्या शैक्षणिक संस्था 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आनंदचा सातवा पराभव – बुद्धिबळ स्पर्धा:

 • पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सातवा पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. आनंदचा आठव्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनकडून 0-5-2-5 पराभव झाला.
 • आनंदला लिरेनविरुद्धच्या लढतीत पहिल्याच डावात अवघ्या 22 चालींमध्ये पराभव पत्करावा लागला.
 • दुसरा डाव दोघांनी 47 चालींत बरोबरीत सोडवला. तिसऱ्या डावात मात्र पुन्हा एकदा आनंदला 41 चालींत पराभव मान्य करावा लागला.
 • आनंदला आता लिरेन आणि पीटर लेको यांच्यासमवेत सहा गुणांसह अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
 • आनंदने सातव्या फेरीत सोमवारी बोरिस गेलफंडला नमवत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला होता. मात्र ती लय आठव्या फेरीत आनंदला राखता आली नाही.

दिनविशेष :

 • संत तुलसीदास महाराज‘ यांनी 30 जुलै सन 1622 मध्ये देहत्याग केला.
 • विल्यम केलॉग यांनी सन 1898 मध्ये कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
 • 30 जुलै 1930 मध्ये पहिला फुटबॉल विश्वचषक ‘उरूग्वे’ने जिकला.
 • जलतज्ज्ञ ‘राजेंद्रसिंह‘ यांना सन 2001 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.