30 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन
डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन

30 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 जानेवारी 2022)

ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत-फिलिपाइन्स करार :

 • फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी 374 दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली.
 • भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे.
 • तर हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
 • लढाऊ जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवारी बीएपीएलने फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.
 • बीएपीएल ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे.

देशात नाकाद्वारे लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी :

 • भारत बायोटेकच्या इंट्रानेझल (नाकाद्वारे लस) करोना लशीच्या वर्धक मात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना भारताच्या औषध नियामकांनी परवानगी दिली आहे.
 • तर या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लस भारताच्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा भाग होतील.
 • इंट्रानेझल लशीच्या वर्धक मात्रेच्या चाचण्यांना परवानगी देण्याची मागणी भारत बायोटेक कंपनीने डिसेंबरमध्ये केली होती.
 • तसेच भारताच्या औषध नियामकांनी गुरुवारी या लशींच्या चाचण्यांस परवानगी दिली.
 • दिल्लीतील एम्ससह देशभरात पाच विविध ठिकाणी या चाचण्या केल्या जातील.
 • तर ही लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती किती प्रमाणात वाढते, तसेच ही लस आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आहे का हे या चाचण्यांद्वारे पाहिले जाणार आहे.

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती :

 • केंद्र सरकारने डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात Chief Economic Advisor (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे.
 • 2022-23 सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
 • तसेच मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्ती होण्याआधी नागेश्वर हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते.
 • तर याआधी नागेश्वर यांची एक लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून ओळख आहे.
 • भारत आणि सिंगापूरमधील अनेक व्यवसायविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे.

टाटा स्टील चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धात भारताच्या अर्जुनला जेतेपद :

 • भारताच्या अर्जुन इरिगेसीने टाटा स्टील चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
 • तर ही स्पर्धा जिंकणारा पी. हरिकृष्णा, बी. अधिबन आणि विदित गुजरातीनंतरचा तो चौथा भारतीय बुद्धिबळपटू ठरला.
 • तसेच या स्पर्धेच्या 12 फेऱ्यांत 18 वर्षीय अर्जुनच्या खात्यावर 9.5 गुण होते. त्यामुळे एक फेरी शिल्लक असतानाच त्याचे जेतेपद पक्के झाले.
 • त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल 100 खेळाडूंमध्येही प्रवेश मिळवला आहे.

दिनविशेष:

 • गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म 30 जानेवारी 1910 मध्ये झाला होता.
 • शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म 30 जानेवारी 1911 रोजी झाला होता.
 • सन 1948 मध्ये नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
 • पीटर लेंको हा सन 1994 मध्ये बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.