3 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 September 2018 Current Affairs In Marathi

3 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 सप्टेंबर 2018)

ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक:

  • 52व्या ISSF World Championship स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. ज्युनिअर खेळाडूंच्या गटात भारताने 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
  • 50 मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या अर्जुनसिंह चिमाने सुवर्णपदकाची कमाई केली, याचसोबत सांघिक प्रकारातही अर्जुनने आपले सहकारी गौरव राणा आणि अनमोल जैन यांच्यासोबत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या सिनीअर खेळाडूंना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. गौरवने वैय्यक्तिक प्रकारातही कांस्यपदक आपल्या नावे केले. ISSF
  • 2020 मध्ये टोकियात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी या स्पर्धेतून खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू कसे खेळ करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे 10 मी. एअर रायफल मिश्र प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने पात्रता फेरीत सातवं स्थान पटकावलं. 0.4 गुणांच्या फरकाने भारतीय जोडीला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. याचसोबत दिपक कुमार-मेहुली घोष, हिना सिद्धु-शाहझार रिझवी, मनू भाकेर-अभिषेक वर्मा जोडीलाही अपयशाचा सामना करावा लागला.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील 25 टक्के पदे रद्द:

  • मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील पदांचा आकृतिबंध निश्‍चित करण्यात आला आहे. यामध्ये चतुर्थश्रेणीतील (ड श्रेणी) शिपाई संवर्गात सरळसेवेची 13 मंजूर पदे आहेत; तर गट ‘ड’ मधील पदोन्नतीची सात पदे मंजूर आहेत.
  • सरळसेवा भरतीतील पदांच्या 25 टक्‍के इतकी पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शिपाईपदावर टाच येणार आहे. सरळसेवा भरतीची या विभागात 13 पदे आहेत. यातील दोन शिपायांच्या सेवा कौशल्य विकास व उद्योजकता विभागास वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही पदे 11 इतकी झाली आहेत.
  • तसेच या पदांपैकी 25 टक्‍के म्हणजे तीन तसेच पदोन्नतीच्या सात पदांच्या 25 टक्‍के म्हणजे दोन पदे रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील 25 टक्‍के शिपाईपदांवर कुऱ्हाड आली आहे.

राज्यातील तीनशे उपकेंद्रांना मिळणार डॉक्‍टर:

  • ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याकडून उपचार मिळावेत. यासाठी बी.ए.एम.एस. पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सहा महिन्यांचा विशेष अभ्यासक्रम निश्‍चित केला आहे. त्यामुळे राज्यातील 10 हजार उपकेंद्रांना स्वतंत्र डॉक्‍टर उपलब्ध होतील. पहिल्या टप्प्यात नाशिकसह राज्यातील 9 जिल्ह्यांतील 300 आरोग्य उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
  • सद्य:स्थितीत आरोग्य उपकेंद्रामध्ये फारसी वैद्यकीय सुविधा नाहीत. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार असल्याने त्याठिकाणी नव्याने वैद्यकीय साहित्यांसह उपकरणे, औषधसाठा, कक्ष उभारणी, आंतररुग्ण सेवा व्यवस्था आदी उभारणीसाठी 7 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. NHM
  • आरोग्य उपकेंद्रात सद्य:स्थिती प्रशिक्षित परिचारिका रुग्णांवर उपचार करते. पण, बऱ्याचदा रुग्णांच्या गंभीर आजाराचे निदान होत नाही. रुग्णही उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा उपजिल्हा रुग्णालयात जाणे टाळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य अनास्था मोठी आहे.
  • तसेच ही समस्या दूर करण्यासाठी आरोग्यसेवा गावात पोचवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ (हेल्थ वेलनेस क्‍लिनिक) उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला जाणार आहेत.
  • उपकेंद्रात प्रशिक्षित डॉक्‍टर उपलब्ध झाल्याने रुग्णांना गावातच उपचार मिळतील. गंभीर आजाराचे निदान होऊन त्यावर प्राथमिक अथवा उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचार करणे शक्‍य होईल.

सुप्रीम कोर्टात पूर्णत: महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ:

  • सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात एकाच वेळी तीन महिला न्यायमूर्ती असल्याची स्थिती सध्या प्रथमच आली असतानाच, येत्या 5 सप्टेंबर रोजी पूर्णपणे महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ न्यायदानासाठी बसणार असल्याचा आगळा योगही साधला जाणार आहे.
  • न्या. आर. भानुमती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांचे पीठ या दिवशी सुनावणी घेणार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजातील 2013 मधील इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.
  • याआधी सन 2013 मध्ये संपूर्णपणे महिला न्यायमूर्तींच्या खंडपीठाने न्यायदान केल्याचा योग सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच आला होता. त्यावेळी न्या. ज्ञानसुधा मिश्रा आणि न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्या पीठाने न्यायदान केले होते.
  • ऑगस्ट महिन्यात न्या. इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायमूर्ती असण्याची स्थिती निर्माण झाली आहे. न्या. बॅनर्जी या स्वातंत्र्योत्तर काळातील केवळ आठव्या महिला न्यायमूर्ती आहेत.
  • विद्यमान महिला न्यायमूर्तींमध्ये न्या. भानुमती या सर्वात ज्येष्ठ असून 13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती. त्या 19 जुलै 2020 रोजी निवृत्त होणार आहेत.

दिनविशेष:

  • सन 1752 मध्ये अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
  • श्रीमती अॅनी बेझंट यांनी 3 सप्टेंबर 1916 मध्ये होमरुल लीगची स्थापना केली.
  • महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
  • लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म 3 सप्टेंबर 1940 मध्ये झाला.
  • सन 1971 मध्ये कतारला स्वातंत्र्य मिळाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.