3 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs
3 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 फेब्रुवारी 2022)
लॉरेओ पुरस्कारासाठी नीरजला नामांकन :
- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला बुधवारी प्रतिष्ठेच्या लॉरेओ ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे.
- तर या विभागात नामांकन मिळालेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला.
- नीरजने गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.
- तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता.
- तसेच या कामगिरीची आता लॉरेस पुरस्कारांकडून दखल घेण्यात आली आहे.
- ‘जागतिक लक्षवेधी कामगिरी’ या पुरस्कारासाठी नीरजसह रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एमा रॅडूकानू, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू प्रेडी, तिहेरी उडीपटू युलिमर रोहास आणि जलतरणपटू अरिअर्ने टिटमस हे खेळाडू शर्यतीत आहेत.
- तर विजेत्यांच्या नावांची एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल.
Must Read (नक्की वाचा):
फेसबुक मेटाच्या डेटा सायन्स वर्कप्लेसमध्ये भारतीय व्यक्तीची प्रमुख म्हणून नियुक्ती :
- गेल्या वर्षी जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदलून मेटा असं केलं.
तर रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. - कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
- तसेच त्यानंतर आता मेटाने अर्पित अग्रवाल यांची कंपनीच्या लंडन कार्यालयात डेटा सायन्स, वर्कप्लेसचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
- अग्रवाल डेटा सायन्स डोमेनच्या आसपासच्या नवीन कल्पनांसाठी काम करणार आहेत.
- मेटामध्ये सामील होण्यापूर्वी, अग्रवाल यांनी बंगळुरूस्थित फिनटेक स्टार्टअप खातबुकमध्ये अॅनालिटिक्स आणि डेटा सायन्स म्हणून दीड वर्ष काम केले.
मिचेलला ‘आयसीसी’चा क्रिकेट सद्भावना पुरस्कार :
- न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिचेलला 2021 वर्षांतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘क्रिकेट सद्भावना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला ट्वेन्टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना झाला.
- तर या सामन्यात इंग्लंडने विजयासाठी न्यूझीलंडपुढे 167 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावातील 18वे षटक आदिल रशीदने टाकले.
- तर या षटकातील पहिल्या चेंडूवर जिमी निशमकडे स्ट्राइक होती. त्याने समोरच्या दिशेने चेंडू मारला आणि त्यांना सहज एका धावेची संधी होती.
- मात्र, समोरील मिचेलने धाव घेण्यास नकार दिला. आपला रशीदला धक्का लागल्याचे वाटल्याने त्याने ही कृती केली. त्यामुळेच मिचेल या पुरस्काराचा मानकरी ठरला.
- तसेच हा पुरस्कार जिंकणारा तो न्यूझीलंडचा चौथा क्रिकेटपटू ठरला.
ट्वेन्टी-20 क्रमवारीत राहुल चौथ्या स्थानी :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या ट्वेन्टी-20 क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत सलामीवीर केएल राहुलने एका स्थानाने आगेकूच करीत चौथे स्थान प्राप्त केले आहे.
- तर विराट कोहली आणि नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा अनुक्रमे 10व्या आणि 11व्या क्रमांकावर कायम आहेत.
- गोलंदाजांच्या यादीत भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 20वा क्रमांक सर्वात अग्रेसर आहे, जसप्रित बुमरा 26व्या क्रमांकावर आहे.
- अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा एकही खेळाडू नाही.
- तर वेस्ट इंडिजच्या अकील हुसैन 18वा क्रमांक आणि जेसन होल्डर 23वा क्रमांक यांनी क्रमवारीत भरारी घेतली आहे.
सहकार क्षेत्राला मोठा दिलासा :
- अर्थसंकल्पात सहकारी संस्थांसाठीचा पर्यायी किमान कर (मॅट) सध्याच्या 18.5 टक्क्यांवरून कमी करून 15 टक्क्यांवर आणला आहे.
- याचप्रमाणे 1 ते 10 कोटींपर्यंत उत्पन्न असलेल्या सहकारी संस्थांवरील अधिभार (सरचार्ज) 12 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंतचा कर कमी करण्यात आल्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे.
- सहकारी संस्थांसाठी पर्यायी किमान दर कमी केल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
- तसेच त्यांचे बहुतांश सदय हे ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरेल.
दिनविशेष:
- स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास 1783 मध्ये मान्यता दिली.
- 1870 मध्ये अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
- भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे 1925 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
- 1966 मध्ये सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
- वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म 1821 मध्ये झाला.