29 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

लोक घरीच कोरोनाची चाचणी करू शकतील:
लोक घरीच कोरोनाची चाचणी करू शकतील:

29 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 जून 2020)

सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली:

 • अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.
 • त्यामुळे आता एकूण लक्षणांची संख्या बारा झाली आहे. नव्या लक्षणात नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचा समावेश आहे.
 • या आधीच्या लक्षणात ताप, अंगाला थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे,घसा खवखवणे यांचा समावेश होता.
 • 2-14 दिवसांत करोनाची लक्षणे दिसतात. त्यात सार्स सीओव्ही 2 विषाणू कारण असतो.
 • सुरुवातीला श्वासात अडचणी, ताप व कफ ही तीन लक्षणे देण्यात आली होती नंतर त्यात थंडी वाजणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे या लक्षणांची भर पडली.
 • आता करोना रुग्णांची संख्या 1कोटीच्या दिशेने असून 4,99,000 बळी गेले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जून 2020)

गेल्या सहा दिवसांत एक लाख 10 हजार रुग्णांची नोद:

 • भारतात रविवारी 19 हजार 700 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.
 • याआधी शनिवारी सर्वाधिक 20 हजार 060 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
 • महत्त्वाचं म्हणजे, फक्त गेल्या सहा दिवसांत एक लाख 10 हजार रुग्णांची नोद झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या पाच लाख 28 हजार 859 वर पोहोचली आहे.
 • महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि तेलंगणनंतर एका दिवसात एका हजाराहून जास्त रुग्णांची नोंद होणारं कर्नाटक चौथं राज्य ठरलं आहे.

लोक घरीच कोरोनाची चाचणी करू शकतील:

 • कोविड 19 चाचण्यांसाठी घरगुती वापराचे चाचणी संच लवकरच प्रत्यक्षात येणार असून दिल्लीची भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या दोन संस्था पर्यायी चाचणी पद्धत शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
 • लोक घरीच ही चाचणी करू शकतीललगेच त्याचा निकालही त्यांना मिळेल.
 • औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया या संस्थेने आर्थिक मदत दिली आहे.
 • या प्रयोगात सहभागी वैज्ञानिकांनी कोविड विरोधात एलायझा (एन्झाइम लिंकड इम्युनोअ‍ॅसे) यावर आधारित चाचणी विकसित केली आहे.

दिनविशेष :

 • सन 1870 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
 • मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
 • ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना सन 2001 या वर्षी एम.पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
 • पं.हृदयनाथ मंगेशकर यांना सन 2001 या वर्षी नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
 • सन 2007 मध्ये ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.