29 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

विराटने पहिलं आणि रोहित शर्मा ने दुसरं स्थान कायम राखलं:
विराटने पहिलं आणि रोहित शर्मा ने दुसरं स्थान कायम राखलं:

29 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 जुलै 2020)

राफेल फायटर अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरणार :

  • भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून सोमवारी म्हणजेच 27 जुलै रोजी उड्डाण केले आहे.
  • पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने आज म्हणजेच बुधवारी 29 जुलै रोजी भारतात लँडिंग करतील.
  • ही विमाने ज्या अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरणार आहेत ते भारतीय हवाई दलाच्या सर्वात जुन्या एअरबेसपैकी एक आहे. हाच एअरबेस राफेल विमानांचा देशातील मुख्य तळ असणार आहे.
  • फ्रान्सच्या समुद्रकिनारी असणाऱ्या बोर्डीऑक्स शहरातील मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन उड्डाण केलेली ही विमाने जवळजवळ सात हजार किमीचा प्रवास करणार आहेत. या विमानांमध्ये एरियल री-फ्युएलिंग म्हणजेच हवेमध्येच इंधन भरण्यात आलं आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2020)

‘वुई चॅट’ अ‍ॅपवर बंदी -परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदविला :

  • ‘वुई चॅट’ या चीनच्या अ‍ॅपवर भारताने बंदी घातल्यानंतर चीनने त्याबाबत भारताकडे राजनैतिक स्तरावर निषेध नोंदविला असून भारताने आपली चूक सुधारावी, असे म्हटले आहे.
  • भारतातील चीनच्या दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदविला असल्याचे सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
  • ‘वुई चॅट’ हे अ‍ॅप टेन्सण्ट होल्डिंग या इंटरनेट सेवेतील कंपनीने विकसित केले असून ते भारतात वास्तव्य करणाऱ्या, काम करणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या चीनच्या नागरिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे.
  • त्याचप्रमाणे चीनमधील भारतीय नागरिकही त्याचा वापर करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक भारतीय उद्योगही त्याचा वापर करीत आहेत.
  • भारताने 29 जून रोजी चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली त्यामध्ये वुई चॅटचाही समावेश आहे. सोमवारी भारताने चीनशी संबंधित आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली.

वैज्ञानिकांच्या मते एकदा करोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही:

  • एकदा करोना झालेल्या व्यक्तीला तो पुन्हा होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर अजूनही ठामपणे देता आले नसले तरी वैज्ञानिकांच्या मते एकदा करोना झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही.
  • आरोग्य तज्ञांच्या मते करोनाचा विषाणू परत शरीरात घुसला तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी काही प्रमाणात प्रतिबंधात्मक शक्ती शरीरात तयार झालेली असते. पण हे संरक्षण किती काळ मिळते हे अजून स्पष्ट झालेले नाही.
  • वैज्ञानिकांच्या मते काही व्यक्ती अशा आहेत ज्यांचा करोना बरा झाल्यानंतर त्यांची चाचणी परत सकारात्मक आली आहे, पण अशा व्यक्तींमध्ये आधीच्याच विषाणू संसर्गातील काही अवशेष शरीरात असू शकतात. त्यामुळे त्यांची चाचणी सकारात्मक येते.

 रशियाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला:

  • दक्षिण चीन समुद्रापासून ते पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणावाची स्थिती निर्माण करणाऱ्या चीनला रशियाने सर्वात मोठा झटका दिला आहे.
  • रशियाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चीनला रशियाकडून ही मिसाइल प्रणाली मिळणार होती.
  • S-400 चा जगातील सर्वात घातक मिसाइल सिस्टिममध्ये समावेश होतो. फायटर विमानांपासून ते शत्रुचा मिसाइल हल्ला परतवून लावण्याची या सिस्टिममध्ये क्षमता आहे. कुठल्याही देशासाठी एक प्रकारचे हे हवाई सुरक्षा कवच आहे.

विराटने पहिलं आणि रोहित शर्मा ने दुसरं स्थान कायम राखलं:

  • भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे.
  • तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला आहे.
  • आयसीसीने वन-डे क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट 871 गुणांसह पहिल्या तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दिनविशेष :

  • 29 जुलै 1852 मध्ये पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
  • जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान 29 जुलै 1920 मध्ये सुरू झाली.
  • टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया 29 जुलै 1946 मध्ये असे नामकरण झाले.
  • 29 जुलै 1957 मध्ये इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.
  • भारत-श्रीलंका शांतता करारावर 29 जुलै 1987 मध्ये सह्या करण्यात आल्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.