29 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
29 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 जुलै 2019)
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा भारतरत्न किताबाने होणार गौरव :
- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या 8 ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे.
- त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात येणार आहे.
- तसेच या किताबासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. तसेच भारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.
- तर यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या किताबाने सन्मानित करण्यात आले होते.
- सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकारचं 100 दिवसांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड येणार :
- मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कामाचं रिपोर्ट कार्ड जारी करण्यात येणार आहे. या रिपोर्टमध्ये नवीन प्रकल्प तसेच महत्वाकांक्षी प्रकल्पाचे अपडेट दिले जाणार आहे.
- पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व मंत्रालयाच्या सचिवांना आपल्या विभागाच्या कामांचा अहवाल तयार करण्यासाठी सांगितले आहे. त्यामध्ये तीन गोष्टींवर जास्त लक्ष देण्यात आलं आहेत. त्यात एखादी योजना अथवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणतं लक्ष्य ठरविण्यात आलं आहे.
- प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काय उपाययोजना आखली आहे. प्रकल्प काय, केव्हा आणि कधी पूर्ण होईल याची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे. मोदी सरकारअंतर्गत प्रत्येक प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी 10 ग्रुप ऑफ सेक्रेटरी बनविले आहे. ते वारंवार पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात राहणार आहेत.
- तसेच पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांकडूनही त्यांच्या खात्यातील मोठ्या प्रकल्पांची यादी मागविली आहे. ती यादी महिनाभरात पूर्ण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की, दुसऱ्या टर्ममध्ये प्रत्येक महिन्याला देशाच्या नागरिकांना पूर्ण झालेला प्रकल्पाचे अपडेट दिले जावे. तसेच सर्व मंत्रालयाकडून गुड गर्व्हनन्सचा वेगळा गट बनवून सरकारच्या चांगल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं जावं असं सांगण्यात आलं आहे.
मेरी कोमचा ‘गोल्डन पंच’ :
- सहा विश्वचषकांची मानकरी असलेली भारताची चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरी कोम व सिमरनजित कौर यांनी इंडोनेशियातील लाबुऑन बाजो येथे सुरू असलेल्या प्रेसिडेंट कप मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.
- तर भारतीय मुष्टीयोद्धयांनी या स्पर्धेत सात सुवर्ण व दोन रौप्यपदक पटकावली.
- या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या चारीही भारतीय महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या गटांत तीन सुवर्ण मिळाली. दोघांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच
ऑलिम्पिकची कांस्यविजेती असलेल्या मेरी कोमने अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाची एप्रिल फ्रँक्स हिच्यावर 5-0 ने सहज विजय साजरा केला.
उत्तर प्रदेश बनणार देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्य :
- दुसऱ्या पायाभरणी समारंभात समाविष्ट असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेश हे एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असलेले देशातील पहिले राज्य बनेल, असे प्रतिपादन फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कल्याण कृष्णमूर्ती यांनी केले.
- तर गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करारांवर स्वाक्षया करण्यात आल्या होत्या. त्यातील 65 हजार कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ येथे पार पडला.
- हा राज्यातील अशा प्रकारचा दुसरा पायाभरणी समारंभ होता. पहिला पायाभरणी समारंभ गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता. पहिल्या टप्प्यात 60 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प समाविष्ट होते.
दिनविशेष :
- 29 जुलै 1852 मध्ये पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
- जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान 29 जुलै 1920 मध्ये सुरू झाली.
- टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया 29 जुलै 1946 मध्ये असे नामकरण झाले.
- 29 जुलै 1957 मध्ये इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.
- भारत-श्रीलंका शांतता करारावर 29 जुलै 1987 मध्ये सह्या करण्यात आल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Nice but Pura current alag alg hona chai ye world wala alg steat Wala alg sport Wala agl