28 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

हॉकी कर्णधार चरणजीत सिंह
हॉकी कर्णधार चरणजीत सिंह

28 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 जानेवारी 2022)

लशींना बाजारातील नियमित वापरास मंजुरी :

 • कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या करोना प्रतिबंधक लशींचा काही अटींवर प्रौढांसाठी नियमित बाजारात वापर करण्यास भारताच्या औषध नियामकांनी परवानगी दिली.
 • तसेच सर्वाना करोना प्रतिबंधक लशीची पहिली व दुसरी मात्रा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्धक मात्रा उपलब्ध करून देण्यासाठी असलेली सरकारची लसीकरण मोहीम यापुढेही सुरू राहील.
 • कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या लशींना सध्या आपत्कालीन वापरासाठी असलेल्या मर्यादित परवानगीचा दर्जा वाढवून त्यांच्या काही अटींच्या अधीन राहून प्रौढ लोकसंख्येसाठी सामान्य वापर करण्याची परवानगी नियामकांनी दिली आहे.
 • यापुढे या दोन लशी खासगी रुग्णालयांमध्ये आधीच निर्धारित केलेल्या कमाल किरकोळ किमतीत उपलब्ध असतील आणि लोक त्या तेथून खरेदी करू शकतील.
 • तर नव्या औषधे व नैदानिक चाचण्या नियम 2019 अन्वये ही मंजुरी देण्यात आली आहे.

पाकिस्तान चीनकडून मिळणार आधुनिक तोफा :

 • चीन पाकिस्तानला एकुण 236 अत्याधुनिक SH-15 या तोफा देणार आहे.
 • तर या तोफा 2019 ला चीनच्या लष्करात दाखल झाल्या असून मोठ्या प्रमाणात तिबेटमध्ये भारताच्या सीमेजवळ तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
 • पाकिस्तानने याआधीच 236 तोफांबाबत करार केला होता, पुढील काही दिवसांत SH-15 तोफांची पहिली तुकडी पाकिस्तानात दाखल होणार असल्याचं वृत्त दिलं आहे.
 • चीनची आघाडीची तोफ म्हणून SH-15 कडे बघितलं जात आहे.
 • आधुनिक अशा ट्रकवर ही तोफ बसवण्यात आली आहे. यामुळे ही तोफ सहज कुठेही वाहून नेणे शक्य होणार आहे.
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तोफेतून तब्बल 72 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करता येणे शक्य आहे. यामुळेच सीमेपासून सुरक्षित अंतरावरुन शत्रु पक्षाच्या भागात खोलवर मारा करणे शक्य आहे.

माजी ऑलिम्पिक हॉकी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन :

 • 1964च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे संघनायक चरणजीत सिंह यांचे प्रदीर्घ आजारपण आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.
 • ऑलिम्पिकमध्ये चरणजीत यांनी अप्रतिम कामगिरी केली परंतु दुखापतीमुळे त्यांना अंतिम सामन्याला मुकावे लागले आणि पाकिस्तानकडून भारताने 0-1 असा निसटता पराभव पत्करला.
 • मग 1964मध्ये चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला 1-0 असे नमवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते.
 • 1962च्या आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्येही त्यांचा समावेश होता.
 • हॉकीमधून निवृत्तीनंतर ते हिमाचल प्रदेश विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात संचालक म्हणून कार्यरत होते.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली :

 • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात आली आहे.
 • तर या परीक्षेसाठी पूर्व नियोजित उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे शक्य नसल्याने 20 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
 • तसेच या संदर्भात अंतिम न्यायनिर्णय येईपर्यंत परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिनविशेष:

 • स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये झाला होता.
 • स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म 28 जानेवारी 1899 मध्ये झाला होता.
 • शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म 28 जानेवारी 1925 मध्ये झाला होता.
 • एच.एम.टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना सन 1961 मध्ये बंगलोर येथे सुरू झाला.
 • सन 1977 मध्ये मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे 15वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.