28 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

आरसीपी सिंह ‘जेडीयू’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
आरसीपी सिंह ‘जेडीयू’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

28 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2020)

आरसीपी सिंह ‘जेडीयू’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष :

 • बिहारची राजधानी पाटणा येथे पार पडलेल्या जनता दल यूनायटेड(जदयू)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला.
 • नितीश कुमार यांनी जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष पद माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडे सोपवलं आहे.
 • तर 2016 मध्ये शरद यादव यांनी पक्ष सोडल्यापासून नितीश कुमार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद होतं.
 • तसेच राजकारणात येण्या अगोदर ते प्रशासकी सेवेत होते.ते उत्तर प्रदेश केडरमधून आयएएस होते. रामपूर, बाराबंकी, हमीरपूर आणि फतेहपूर येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2020)

मिलिंद नार्वेकर ‘एमपीएल’च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष :

 • मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आगामी मुंबई प्रीमियर लीग ट्वेन्टी-20 क्रिकेटसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी साहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
 • तर सुरेश सामंत यांना या समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे.
 • अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड अशा अनेक नेत्यांची ‘एमसीए’च्या उपसमित्यांवर नेमणूक झाली आहे.
 • तर पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि आशीष शेलार यांनी तर ‘एमसीए’चे अध्यक्षपद भूषवले आहे.

ICC च्या संघात भारतीयांचा बोलबाला :

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. दशकातील सर्वोत्तम 11 खेळाडूंची आयसीसीनं निवड केली आहे.
 • तर अभिमानाची बाब म्हणजे या तिन्ही संघाचं नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे आहे.
 • एकदिवसीय आणि टी-20 संघाचं कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली आहे.
 • तसेच तिन्ही संघामध्ये स्थान पटकावणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. विराट कोहलीला टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.

जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई :

 • यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दिसतो.
 • पण आता उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगणाऱ्या गाड्यांवर कारवाई सुरु केली आहे.
 • तर पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर वाहतूक विभागाने हे पाऊल उचलले आहे.
 • तसेच उत्तर प्रदेशत आता जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत.

दिनविशेष:

 • सन 1836 मध्ये स्पेनने मेक्सिको या देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष सन 1846 मध्ये स्थापन झाला.
 • प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेयरमन ‘धीरूभाई अंबानी‘ यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता.
 • टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
 • सन 1948 मध्ये मुंबई मध्ये कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.