28 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

‘एवॅक्स’ सिस्टम चीन-पाकिस्तानवर ठेवणार नजर:
‘एवॅक्स’ सिस्टम चीन-पाकिस्तानवर ठेवणार नजर:

28 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2020)

भारतीय कंपनी बनवतेय प्लाझ्मा थेरीपीची लस:

 • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे.
 • पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे.
 • देशातील फार्मा कंपनी इंटास फार्मानं प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केलं आहे.
 • रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
 • हायपरिम्युन ग्लोब्युलिन (Hyperimmune Globullin) ला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
 • गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2020)

‘एवॅक्स’ सिस्टम चीन-पाकिस्तानवर ठेवणार नजर:

 • चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोका लक्षात घेऊन भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 • एवॅक्स सिस्टिमला आकाशातील भारताचे नेत्र म्हटले जाते.
 • ही इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम रशियन बनावटीच्या इल्यूसीन-76 विमानावर बसवण्यात येणार आहे.
 • आंतरमंत्रालयीन समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्रायलबरोबर एवॅक्स सिस्टिमचा करार करण्यासाठी सुरक्षासंबंधातील मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मिळणार आहे.

मी भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती – अजिंक्य रहाणे:

 • इंग्लंडमध्ये 2019 साली आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं.
 • साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणारे भारतीय फलंदाज उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर पुरते ढेपाळले.
 • तत्कालीन निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी या जागेसाठी अनेकांना संधी दिली.
 • भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही या शर्यतीत होता, पण त्याला संघात संधीच दिली नाही.
 • अजिंक्यच्या मते विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो योग्य उमेदवार होता.

दिनविशेष :

 • सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
 • भारतीय पदार्थवैज्ञानिक एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
 • टोयोटा मोटर्स ही सन 1937 मध्ये स्वतंत्र कंपनी बनली.
 • ‘पोकेमोन’चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1965 मध्ये झाला.
 • 28 ऑगस्ट 1969 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.