27 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 November 2018 Current Affairs In Marathi

27 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 नोव्हेंबर 2018)

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा:

 • निवडणूक आयुक्त सुनील अरोरा देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचे स्थान ते घेतील. निवडणूक आयोगाने या नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या 2 डिसेंबरला अरोरा हे पदभार स्वीकारतील. रावत यांचा कार्यकाळ 1 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. Sunil Arora
 • अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 1980च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. 31 ऑगस्ट 2017 रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
 • विधी मंत्रालयाने 26 नोव्हेंबर रोजी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर परवानगीसाठी तो राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्राने माहिती दिली.
 • राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना 62 वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
 • तसेच त्याबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते 1993 ते 1998 पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि 2005 ते 2008 पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.

नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग:

 • नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे.
 • सोमवार आणि मंगळवारच्या (दि. 26 आणि 27 नोव्हेंबर) दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
 • मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19800 किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.
 • सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
 • नासाने म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर 10 ते 16 फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे 15 टक्के अधिक खोल असेल. 2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.

अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार:

 • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. Azim Premji
 • आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.
 • तसेच प्रेमजी यांच्यापूर्वी भारतातील बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि अभिनेता शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आयसीसी टी-20 संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर:

 • ICC चा महिला विश्व टी-20 संघाच्या कर्णधारपदी भारताच्या हरमनप्रीत कौरची वर्णी लागली आहे. 25 नोव्हेंबर रोजी आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
 • महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला होता. विश्व महिला टी-20 संघात तीन भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे.
 • सलामीवीर म्हणून स्मृती मंधनाची निवड झाली आहे. तर फिरकी गोलंदज म्हणून पूनम यादवचा समावेश करण्यात आला आहे.
 • वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारावर अंतिम 12 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या या संघात इंग्लंड आणि भारतीय संघाच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
 • तसेच पाकिस्तान, न्यूझीलंड, विडींज आणि बांगलादेशच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. बांगलादेशच्या खेळाडूला 12वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

भारताला दहशतवादविरोधी लढ्यात मिळाली अमेरिकेची साथ:

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.
 • दशतदवादाला आपण जिंकू देणार नाही असे त्यांनी ट्विटद्वारे जाहीररित्या सांगितले आहे. त्याचबरोबर, अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारांना पकडून देणाऱ्यांना 50 लाख डॉलर (35 कोटी) रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. 26-11 attack
 • तर यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांसोबत 166 निर्दोष लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळ जाऊ देणार नाही.
 • तत्पूर्वी, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे.
 • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली होती.
 • तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करुन ती 50 लाख डॉलर्स अर्थात 35 कोटी रुपये इतकी करण्यात आल्याचे जाहीर केले होते.

दिनविशेष:

 • इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द.ब. पारसनीस यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1870 मध्ये झाला होता.
 • पॅनासोनिक चे संस्थापककोनसुके मात्सुशिता‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला होता.
 • विख्यात हिंदी साहित्यिकहरीवंशराय बच्चन‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.
 • अमेरिकन अभिनेता तसेच मार्शल आर्ट तज्ञब्रूस ली‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 मध्ये झाला होता.
 • 27 नोव्हेंबर 1978 हा दिवस भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापकलक्ष्मीबाई केळकर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
 • सन 1995 मध्ये पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.