27 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
27 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 जून 2019)
‘एशिया पॅसिफिक’चा भारताला पाठिंबा :
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात दोन वर्षे मुदतीच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीस चीन व पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या एशिया-पॅसिफिक गटाने पाठिंबा दिला आहे.
- तसेच पंधरा सदस्यीय सुरक्षा मंडळातील पाच अस्थायी सदस्यपदांसाठी पुढील वर्षी जूनमध्ये निवडणूक होत असून यात निवड झालेल्या अस्थायी सदस्यांना 2021 व 2022 अशी दोन वर्षे काम करता येईल.
- तर एशिया-पॅसिफिक गटातील देशांनी भारताच्या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा दिला आहे. सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्यत्व 2021 व 2022 अशा दोन वर्षांसाठी आहे.
- सर्व 55 सदस्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी भारताच्या वतीने आपण आभार मानतो, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले.
- सध्याचे दहा अस्थायी सदस्य बेल्जियम, कोटव्हॉयर, डॉमनिक प्रजासत्ताक, विषुवृत्तीय गिनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवेत, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका आहेत.
Must Read (नक्की वाचा):
बालाकोट स्ट्राइकचे रणनितीकार ‘RAW’ चे नवीन चीफ :
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या एअर स्ट्राइकच्या प्लानिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे रॉ चे अधिकारी सामंत गोयल यांची आता रॉ च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- एअर स्ट्राइकच्या ऑपरेशननंतर तीन महिन्यात गोयल यांची एजन्सीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल हे 1984 च्या पंजाब केडरचे अधिकारी आहेत. 90 च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद शिखरावर होता. त्यावेळी हा दहशतवाद संपवण्यात सामंत गोयल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दुबई आणि लंडनमध्ये सुद्धा त्यांनी सेवा बजावली आहे.
- तसेच सामंत गोयल अनिल कुमार धसमाना यांची जागा घेतली. अडीचवर्षाच्या शानदार सेवेनंतर धसमाना निवृत्त होत आहेत. सामंत गोयल सध्या रॉ च्या ऑपरेशन्स विभागाची जबाबदारी संभाळत आहेत. बालाकोट एअर स्ट्राइक आणि
उरी हल्ल्यानंतर 2016 साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीमध्ये सामंत गोयल यांची भूमिका महत्वाची होती. सामंत गोयल यांना रॉ मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते. - तर अरविंद कुमार यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी गृहमंत्रालयाने फाईलवर स्वाक्षरी केली असून पंतप्रधान कार्यालयाला ही फाईल पाठवण्यात आली आहे.
- पीएमओमधी वरिष्ठ अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला ही माहिती दिली. 30 जूनला दोन्ही अधिकारी पदभार संभाळतील. गोयल आणि कुमार दोघेही 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातपडताळणीविना प्रवेश :
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही. या विद्यार्थ्यांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास ते सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.
- तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याकडे लक्ष वेधले. जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाची पावती ग्राह्य धरावी, अशी मागणी त्यांनी केली.
- तसेच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी जातवैधता प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना जाहीर करण्यात आली होती.
- त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीत जात प्रमाणपत्राची सक्ती न करण्याचा निर्णय झाला.
तर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा तूर्त उपलब्ध नाही. त्यामुळे व्यवसायिक अभ्यासक्रमांना ज्या विद्यार्थ्यांनी समितीकडे जातपडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यांस प्रवेशावेळी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती आता केली जाणार नाही.
दिनविशेष :
- काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म 27 जून 1864 मध्ये झाला.
- दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म 27 जून 1875 मध्ये झाला.
- अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र 27 जून 1954 रोजी मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.
- अर्थतज्ज्ञ द.रा. पेंडसे यांना सन 1996 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान प्राप्त झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा