27 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
27 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2020)
आठवडय़ातून तीनदा विमान सेवा सुरू करण्यात येणार:
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी टाळेबंदीमुळे जारी करण्यात आलेले अनेक निर्बंध शिथिल करीत असल्याची घोषणा केली.
- करोनाची मोठय़ा प्रमाणावर लागण असलेल्या सहा राज्यांमधून पश्चिम बंगालमध्ये विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.
- राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबर रोजी पूर्ण टाळेबंदी जारी करण्यात येणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली.
- 1 सप्टेंबरपासून या राज्यांमधून आठवडय़ातून तीनदा विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
Must Read (नक्की वाचा):
स्पुटनिक 5 लशीच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा प्रस्ताव:
- रशियाने कोविड 19 विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेल्या ‘स्पुटनिक 5’ या लशीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी रशियाने भारत सरकारकडे भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे.
- लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यासाठी भारताने मदत करावी अशीही रशियाची अपेक्षा आहे.
- सरकारी सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची बैठक 22 ऑगस्टला झाली त्यात या विषयावर चर्चा झाली आहे.
- स्पुटनिक 5 लस रशियाच्या गमालेया संशोधन संस्थेने तयार केली असून त्यासाठी रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचा वापर करण्यात आला आहे.
रैनाने जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याची दाखवली तयारी:
- महेंद्रसिंह धोनीसोबतच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
- निवृत्तीनंतरही धोनी पुढची काही वर्ष चेन्नई संघाकडून आयपीएल खेळत राहणार आहे.
- तर दुसरीकडे सुरेश रैनानेही निवृत्तीनंतर कौतुकास्पद पाऊल टाकलं आहे. रैनाने जम्म-काश्मीरमधील ग्रामीण भागांतील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आहे.
- जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंग आणि अनंतनागचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक संदीप सिंग यांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे.
दिनविशेष :
- सन 1957 मध्ये मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
- उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 मध्ये झाला.
- इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला.
- संतसाहित्याचे अभ्यासक वि.रा. करंदीकर यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.