27 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

27 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 एप्रिल 2020)

IITs, IIITs कडून 2020-21 या शैक्षणिक वर्षात फी वाढ नाही :

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या केंद्रीय शैक्षणिक संस्था 2020-21 या शैक्षणिक वर्षात कुठल्याही अभ्यासक्रमासाठी ट्युशन फी वाढवणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.
  • त्याचबरोबर ज्या आयआयआयटी या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर चालवल्या जातात त्या देखील पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्यांच्या कुठल्याही कोर्ससाठी फी वाढ करणार नाहीत, असंही केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी स्पष्ट केलं.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 एप्रिल 2020)

कोटामध्ये अडकलेल्या 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार :

  • उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
  • तर त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली.
  • महाराष्ट्र सरकारनं राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या 1800 ते 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे.
  • केंद्र आणि राज्यस्थान सराकरने परवानगी दिल्यानंतर दोन ते तीन दिवासांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखली जात आहे.

अमेरिकेत 72 औषधांवर चाचण्या :

  • कोविड 19 म्हणजे करोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लशी मिळून एकूण 72 घटकांवर चाचण्या सुरू असून 211 घटक हे कोविड 19 उपचारातील नियोजन पातळीवर आहेत, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
  • तर अन्न व औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हान यांनी व्हाइट हाउस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, लस व औषधे शोधून काढण्याचे काम प्रगतिपथावर असून अन्न व औषध प्रशासनाने दोन आस्थापनांना लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे.
  • तसेच उत्पादकांना प्रतिपिंड चाचण्यांसाठीच्या संचांची अधिकृत तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. या चाचण्यांना एफडीएने परवानगी मात्र दिलेली नाही.

चीनमध्ये करोनावरील तिसऱ्या लशीच्या चाचण्यांना मान्यता :

  • चीनने कोविड 19 म्हणजे करोना विषाणूवरील तिसऱ्या लशीच्या वैद्यकीय चाचण्यांना मान्यता दिली आहे .
  • चीनने म्हटले आहे की, त्यांनी तीन करोना लशींच्या चाचण्यांना मान्यता दिली असून त्यात पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चिनी लष्कराने विकसित केलेल्या लशीचा समावेश आहे.
  • तर वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ बायॉलॉजिकल प्रॉडक्टसने चायना फार्मास्युटिकल ग्रुपच्या नेतृत्वाखाली एक लस तयार केली आहे, तर वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी संस्थेने एक लस तयार केली आहे या दोन्ही लशींच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत.
  • तसेच ‘निष्क्रिय’ लस याचा अर्थ रोगनिर्माण क्षमता नसलेले जीवाणू किंवा विषाणू तसेच इतर रोगजंतू वापरून केली जाणारी लस असा आहे. वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेने करोनावर एक लस तयार केली आहे.

पाकिस्तानची माजी कर्णधार साना मिर क्रिकेटमधून निवृत्त :

  • पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार साना मिरने 15 वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
  • तर 34 वर्षीय सानाने 226 सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. यापैकी 2009 ते 2017 या कालखंडातील 137 सामन्यांत देशाचे नेतृत्व केले.
  • तसेच पाकिस्तानतर्फे एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील सर्वाधिक बळी ऑफ-स्पिनर सानाच्या नावे आहेत. तिने 120 सामन्यांत 150 बळी मिळवले आहेत, तर 106 ट्वेन्टी-20 सामन्यांत 89 बळी मिळवले आहेत.

दिनविशेष:

  • मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म 27 एप्रिल 1791 रोजी झाला.
  • सन 1854 मध्ये पुण्याहून मुंबईला तारायंत्राव्दारे पहिला संदेश पाठविला गेला.
  • चौथ्या ऑलिम्पिक खेळांना सन 1908 मध्ये लंडन येथे सुरुवात झाली होती.
  • सन 1961 मध्ये सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • एकाच अग्निबाणाव्दारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली सन 1999 मध्ये भारतात तयार झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.