26 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Kendra Sarkar
Kendra Sarkar

26 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 मार्च 2020)

केंद्राकडून होणार दीड लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा :

 • करोना विषाणूमुळे लॉकडाऊन झेलणाऱ्या देशाला संकटापासून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1.5 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.
 • मात्र, यावर अद्याप सरकारकडून अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेमध्ये चर्चा सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.
 • केंद्र सरकारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आर्थिक मदत योजना 2.3 लाख कोटींपर्यंतही असू शकते. मात्र, अंतिम आकड्याबाबत अद्यापही चर्चा सुरुच आहे. या आठवड्याच्या शेवटापर्यंत याची घोषणा होऊ शकते.
 • याद्वारे 10 कोटी लोकांच्या बँक खात्यात थेट रक्कम टाकली जाणार आहे. ही मदत गरीबांना आणि त्या लोकांना दिली जाणार आहे ज्यांच्यावर लॉकडाऊनमुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मार्च 2020)

केंद्र सरकार गहू 2 रुपये तर तांदूळ 3 रुपये किलो दराने देणार :

 • केंद्र सरकार 80 कोटी लोकांना 27 रुपये किलोचा गहू 2 रुपये किलोने देणार तर 37 रुपये किलोचा तांदूळ 3 रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
 • सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
 • दूध, किराणा, रेशन, मांस, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकानं सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारं आहेत असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय विद्यालयाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द :

 • करोना व्हायरसमुळे पुढचे 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये राहणार आहे. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत सर्वच महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
 • काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पुढच्यावर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. अन्य राज्यांनी सुद्धा परीक्षा ने घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • आता भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालयाने 2019-20 या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • 2009 सालच्या शिक्षणअधिकार कायद्यातंर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे

देशातील टोलनाक्यांवर तात्पुरती टोल वसुली बंद :

 • देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं 14 एप्रिल पर्यंत म्हणजेच 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला आहे.
 • दरम्यान. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांवर तात्पुरता टोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • आपात्कालिन सेवांना काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर तात्पुरत्या स्वरूपात टोल बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

‘लॉकडाऊन’ तोडल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा :

 • कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे; यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने सविस्तर नियमावली जारी केली आहे.
 • त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्रालयाने या नियमावलीचे कसोशीने व कठोरपणे पालन करण्याचा आदेशही सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.
 • या ‘लॉकडाऊन’ची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली असली, तरी हा कठोर उपाय योजण्याचा निर्णय राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या कार्यकारिणीने घेतला आहे.
 • त्याच कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून उपर्युक्त नियमावली व आदेश जारी करण्यात आला आहे.
 • तसेच या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हाती भारतीय दंड विधानाचे कलम 188 आधीपासूनच आहे. सरकारी अधिकाºयाने दिलेल्या वैधानिक आदेशाचे उल्लंघन करणे, हा या कलमान्वये गुन्हा आहे व त्यासाठी सहा महिन्यांपर्यंतच्या कैदेची तरतूद आहे; परंतु प्राप्त परिस्थितीत याहून कडक शिक्षेची गरज लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या 51 ते 60 या कलमांचाही वापर करण्याचा आदेश दिला आहे.

दिनविशेष :

 • 26 जानेवारी 1552 मध्ये गुरु अमर दास शिखांचे तिसरे गुरु बनले.
 • इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह 26 जानेवारी 1942 मध्ये झाला.
 • 26 जानेवारी 2013 मध्ये त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.