26 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेत काम करत:
जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेत काम करत:

26 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 जून 2020)

जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेत काम करत:

 • चांद्रयान 2 मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 ची तयारी सुरु केली.
 • तसेच जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेत चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
 • तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्याचा भारताचा संकल्प आहे. आतापर्यंतच्या चंद्र मोहिमांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा कोणीही अभ्यास केलेला नाही.
 • जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक सयान चॅटर्जी, डॉ. अमितवा गुप्ता इस्रोसोबत चंद्रावरील लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
 • चंद्रावरील प्रत्यक्ष लँडिंगच्यावेळी कशी स्थिती असेल तो विचार करुन सिम्युलेशन मॉडेलवर ते काम करत आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जून 2020)

आणीबाणीला आज 45 वर्षे पूर्ण:

 • तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी 25 जून 1975 रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली.
 • तर तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या 352(1) कलमानुसार 25 जूनच्या रात्री आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि लगेचच आणीबाणी लागू झाली.
 • आज त्या घटनेला 45 वर्षे पूर्ण होत आहेत.

24 वर्षीय मार्शलने पाचवे स्थान मिळवले -फुटबॉल लीग:

 • आघाडीवीर अँथनी मार्शलने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात शेफील्ड युनायटेडला 3-0 अशी धूळ चारली.
 • तर 24 वर्षीय मार्शलने अनुक्रमे सातव्या, 44व्या आणि 74व्या मिनिटाला तीन गोल नोंदवून मँचेस्टरला एकहाती विजय मिळवून दिला.
 • या विजयासह मँचेस्टरने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले. त्यांच्या खात्यात 31 सामन्यांतून 13 विजयांसह 49 गुण जमा आहेत.

भारतात एका दिवसात 17 हजार रुग्ण नोंदवण्यात आली:

 • भारतात गुरुवारी करोना संसर्गाची एका दिवसातील सर्वाधिक, म्हणजे सुमारे 17 हजार प्रकरणे नोंदवण्यात आली.
 • तर यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या 4.73 लाख इतकी झाली असून, मृतांची संख्या 15 हजारांच्या आसपास पोहचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
 • तसेच गुरुवारी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 16 हजार 922 प्रकरणे नोंदवण्यात आल्याने आजवरची एकूण संख्या 4,73,105 इतकी झाली.
 • तर आणखी 418 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या 14 हजार 894 इतकी झाली आहे.

दिनविशेष :

 • 26 जून 1819 मध्ये सायकलचे पेटंट देण्यात आले आहे.
 • सोमालिया देशाला 26 जून 1960 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
 • 26 जून 1960 मध्ये मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
 • शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे 26 जून 1999 मध्ये चलनात आले.
 • 26 जून 1874 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.