26 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

लसीकरणाची नोंदणी आता व्हॉट्स अ‍ॅपवर
लसीकरणाची नोंदणी आता व्हॉट्स अ‍ॅपवर

26 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2021)

लसीकरणाची नोंदणी आता व्हॉट्स अ‍ॅपवर :

  • व्हॉट्सअ‍ॅप या संदेशवहन उपयोजनावर आता करोना प्रतिबंधक लसीकरणाची वेळ घेता येणार आहे, वापरकर्ते त्यांच्या जवळच्या केंद्रात माय गव्ह करोना हेल्पडेस्कच्या मदतीने नाव नोंदवू शकणार आहेत.
  • तर 5 ऑगस्टला माय गव्ह व व्हॉटसअ‍ॅप यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा चॅटबोटच्या मार्फत दिली होती.
  • तसेच 32 लाख प्रमाणपत्रे त्यावरून डाऊनलोड करण्यात आली आहेत.
  • मायगव्ह करोना हेल्पडेस्क व्हॉटसअपवर तयार करण्यात आले असून मार्च 2020 पासून त्यावर करोनाबाबतची खरी माहिती अफवा टाळण्यासाठी दिली जात आहे.
  • आता त्यात लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय जवळची लसीकरण केंद्रेही शोधता येणार आहेत. त्यात कुठल्या वेळेला लस घ्यायची हेही ठरवता येईल. लसीकरण प्रमाणपत्रेही डाऊनलोड करता येणार आहेत.
  • तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी ही व्यवस्था असून चॅटबोटच्या मदतीने ते साकारण्यात आले आहे. देश डिजिटलायझेशनमध्ये सक्षम होत असल्याचे ते निदर्शक आहे.
  • मायगव्ह करोना हेल्प डेस्क चॅटबोटशी संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपवर 91— 9013151515 हा क्रमांक सेव्ह करायचा आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2021)

ICC WTC रँकिंगमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन गुणांची आकडेवारी जाहीर केली आहे.
  • तर डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे.
  • वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला झाला आणि तो 14 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंड दोन गुणांसह या यादीच्या तळाशी आहे.
  • भारतीय संघ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद 2021-23 गुणांच्या यादीत अव्वल आहे, कारण संघाने इंग्लडविरुद्ध एक सामना जिंकला आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला. तिसऱ्या स्थानावर विंडीज संघ आहे, ज्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे.
  • इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे, जो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या नवीन फेरीत इंग्लंडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.

दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काही लेखकांचे साहित्य वगळले :

  • प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी यांची लघुकथा आणि दोन लेखकांना पर्यवेक्षण समितीने इंग्रजी अभ्यासक्रमातून हटवल्यामुळे दिल्ली विद्यापीठ टीकेचा विषय ठरले आहे.
  • विद्वत परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या परिषदेच्या 15 सदस्यांनी पर्यवेक्षण समितीविरुद्ध (ओव्हरसाईट कमिटी) भिन्नमत टिप्पणी सादर केली.
  • ‘लर्निग आऊटकम्स बेस्ट करिक्युलम फ्रेमवर्क’च्या पाचव्या सत्रासाठीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात ‘कमाल गुंडगिरी’असल्याचा आरोप त्यांनी केला.
  • ओसीने सुरुवातीला बामा व सुखार्थारिनी या दोन दलित लेखकांना हटवून त्यांच्या जागी ‘उच्चवर्णीय लेखक रमाबाई’ यांना आणले, असे ते म्हणाले.
  • यानंतर पश्चातबुद्धीने या समितीने कुठलाही शैक्षणिक तर्क न देता अचानक महाश्वेता देवी यांची ‘द्रौपदी’ ही एका आदिवासी महिलेवर असलेली प्रसिद्ध कथा हटवण्यास इंग्रजी विभागाला सांगितले, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला.
  • तर या कथेच्या शैक्षणिक मूल्यामुळे ती 1999 सालापासून दिल्ली विद्यापीठात शिकवली जात आहे.

चीनच्या शालेय शिक्षणात राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे धडे :

  • चीनने आपल्या शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल केला आहे. आता प्राथमिक शालेय शिक्षणापासून महाविद्यालय शिक्षणात राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे धडे शिकवले जाणार आहेत.
  • तसेच समाजवादाबाबत त्यांच्या विचार चीनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकणं अनिवार्य असणार आहे. चीनच्या शिक्षण याबाबतची माहिती दिली आहे.
  • शी जिनपिंग यांचे विचार पाठ्यपुस्तकातून शिकवल्यास विद्यार्थ्यांना मार्क्सवादी विचारधार समजण्यास मदत होईल, असंही त्यांनी पुढे सांगितलं. या अभ्यासक्रमाबाबत सूचना जारी करण्यात आली आहे.
  • शी जिनपिंग 2012 सालापासून चीनच्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येय धोरणांचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

दिनविशेष :

  • 26 ऑगस्ट 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
  • भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा 26 ऑगस्ट 1910 मध्ये जन्म.
  • 26 ऑगस्ट 1999 मध्ये डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.