25 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक मॉस्कोतील संचलनात सहभागी:
भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक मॉस्कोतील संचलनात सहभागी:

25 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 जून 2020)

भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक मॉस्कोतील संचलनात सहभागी:

 • रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोत दुसऱ्या महायुद्धातील विजय दिनाच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यकमातील संचलनास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
 • भारताच्या सैन्य दलाची तुकडी या संचलनात सहभागी असल्याचा अभिमान वाटतो, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
 • ते तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांना मॉस्कोतील लाल चौकात आयोजित संचलनासाठी निमंत्रित केले होते.
 • भारताच्या तीनही सेनादलातील सैनिकांचे पथक संचलनात सहभागी आहे, याचा अभिमानाच आहे असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जून 2020)

आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी या चाचणीतून कळणार करोना होऊन गेला का :

 • आता करोना होऊन गेला का? याची खातरजमा करण्यासाठी एका चाचणीतून करता येणार आहे.
 • आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी चाचण्यांच्या माध्यमातून हे माहिती करून घेता येणार आहे.
 • तसेच आयजी-जी अँटिबॉडीच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आधारित रक्त चाचणी साहित्याचा पुरवठा सुरू केल्याचे अॅबॉटने आज जाहीर केले आहे.
 • तर या चाचणीची 1 दशलक्ष किट्स भारतात पुरवण्याची क्षमता असल्याचा विश्वास अॅबॉटनं व्यक्त केला आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 56 हजारांवर गेला

 • देशातील कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी 4 लाख 56 हजारांवर गेला असताना, त्यात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 42 हजार 900 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
 • त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर येथील परिस्थिती काळजी वाटावी, अशी आहे.
 • महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 51.64 टक्के आहे.
  देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.71 टक्के आहे.

दिनविशेष :

 • 25 जून हा दिवस ‘जागतिक कोड त्वचारोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा 25 जून 1918 मध्ये जारी केला.
 • 25 जून 1947 रोजी द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
 • पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 मध्ये देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती.
 • सन 1983 मध्ये भारताने प्रथम क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.