25 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

K-9 वज्र
K-9 वज्र

25 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 जानेवारी 2022)

राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील 29 बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
 • केंद्र सरकारच्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी युवा वर्ग असून बालकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचा अवलंब केला पाहिजे, असे पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी संवाद साधताना सांगितले.
 • ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधानांनी सर्व पुरस्कारप्राप्त बालकांना डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप केले.
 • तर पुरस्कारप्राप्त 29 बालकांमध्ये 14 बालिकांचा समावेश होता.
 • तसेच नवसंशोधन, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या विभागांत हे पुरस्कार देण्यात
  केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
 • तर यावर्षी 2020-21 व 2021-22 या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

लष्करात आणखी K-9 वज्र तोफा दाखल होणार :

 • संरक्षण दल लष्करासाठी दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान असलेल्या आणखी 200 K-9 तोफा विकत घेणार आहे.
 • तर यासाठी लवकरच भारतात या तोफांची निर्मिती करणाऱ्या लार्सन अँड टुर्बोला 200 तोफांची ऑर्डर दिली जाणार असल्याचं वृत्त दिले आहे.
 • लष्करात 1990 च्या दशकानंतर नवीन तोफा या दाखल झाल्या नव्हत्या.
 • तर बदलती परिस्थिती, सीमेवरील देशांची युद्धसज्जता लक्षात घेता गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या तोफा या लष्करात दाखल होण्यास सुरुवात झाली.
 • तसेच यामध्ये भारतीय बनावटीची बोफोर्स सदृश्य ‘धनुष’ तोफ, अमेरिकेची M777 या दोन नवीन तोफांबरोबर दक्षिण कोरीयाचे तंत्रज्ञान असलेली स्वयंचलित K-9 तोफ लष्करात दाखल झाली.
 • तंत्रज्ञान हस्तांतराचा करार होत लार्सन अँड टुर्बोच्या सहाय्याने भारतातच या तोफांची निर्मिती करण्यात आली.
 • तर ‘वज्र’ असे नावही या तोफेला देण्यात आले आहे.

स्मृतीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर मोहोर :

 • भारताची तडाखेबाज सलामीवीर स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
 • डावखुऱ्या स्मृतीने 2021 वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दिमाखदार कामगिरी करताना कारकीर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला.
 • वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रेचल हेहो फ्लिंट’ करंडक पटकावताना 25 वर्षीय स्मृतीने इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट, दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली आणि आर्यलडची गॅबी लेविस यांच्यावर सरशी साधली.
 • तसेच स्मृतीने याआधी 2018 मध्येही हा पुरस्कार मिळवला होता.
 • तर‘आयसीसी’चा वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दोन वेळा जिंकणारी ती एलिस पेरीनंतर विश्वातील केवळ दुसरीच खेळाडू ठरली आहे.
 • वर्षांतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पटकावला.

दिनविशेष:

 • 25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ आहे.
 • 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कायदा करून मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
 • मॉस्को विद्यापीठाची स्थापना सन 1755 मध्ये झाली.
 • सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या ‘रमाबाई रानडे’ यांचा जन्म 25 जानेवारी 1862 रोजी झाला होता.
 • सन 1971 या वर्षी हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे 18वे राज्य बनले.
 • आचार्य विनोबा भावे यांना सन 1982 मध्ये भारतरत्‍न प्रदान.
 • मोरारजी देसाई यांना सन 1991 या वर्षी भारतरत्‍न प्रदान.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.