24 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 November 2019 Current Affairs In Marathi

24 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2019)

टीम इंडियाची विक्रमी कामगिरी तब्बल 10 वर्ष जूना विक्रम मोडला :

  • कर्णधार विराट कोहलीचं विक्रमी शतक आणि भारतीय जलदगती गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने कोलकाता कसोटीत धडाकेबाज कामगिरी केली आहे.
  • बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारताने आपला पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केला.
  • भारताकडे पहिल्या डावात 241 धावांची मजबूत आघाडीही आली. यादरम्यान भारतीय संघाने इंग्लंडच्या नावावर असलेला तब्बल 10 वर्ष जूना विक्रम मोडला आहे.
  • 2019 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारताने आपला डाव घोषित करण्याची ही सातवी वेळ ठरली आहे. याआधी 2019 साली इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये 6 वेळा आपला डाव घोषित केला होता.

ईशान्य भारतातील पर्वतरांगेत सापाच्या नव्या प्रजातीचा शोध :

  • जमिनीखाली राहणाऱ्या आणि गांडूळ खाणा-या नव्या प्रजातीच्या सापाचा शोध ईशान्य भारतातील पर्वतरांगातून म्हणजेच अरुणाचल प्रदेशात लागला.
  • अरुणाचल प्रदेशमध्ये या प्रजातीच्या सात प्रजाती आढळत असून, आता आठव्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.
  • बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे संचालक डॉ. दीपक आपटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचेच नाव या सापाला देण्यात आले आहे.
  • त्यामुळे हा साप ‘ट्रकिशीयम आपटेई’ या नावाने ओखळला जाणार आहे.
  • ट्रकिशीयम प्रजातीच्या इतर प्रजातींपेक्षा या नव्या प्रजातीच्या शरीरावर जास्त खवले आहेत, हे त्याचे मुख्य वैशिष्ट्ये आहे, तसेच डोळ्याच्या मागे जो आडवा पट्टा असतो तो जवळ जवळ दिसतच नाही.
  • तर ही प्रजात गांडूळ खाते आणि 293 ते 299 मिलीमीटरपर्यंत त्याची लांबी असते. जवळपास तीन महिने या प्रजातीवर संशोधन झाले. संशोधनादरम्यान या प्रजातीच्या दोन मादी निदर्शनास आल्या.

खासगी कंपन्यांनी ‘आधार’ वापरण्यास आव्हान :

  • आधार कार्ड माहिती खासगी आस्थापनांना वापरण्यास परवानगी देण्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी करून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
  • ग्राहकांनी ओळख पटवण्यासाठी स्वत:हून दिलेली आधार कार्ड माहिती वापरण्यास खासगी आस्थापनांना परवानगी देण्याची तरतूद आधार कायद्यात 2019 मधील दुरुस्तीने करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालातील आदेशांचे उल्लंघन झाले आहे,असे एस.जी वोम्बाटकेरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
  • त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश शरद बोबडे व न्या. बी.आर.गवई यांच्या पीठाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.

आनंदला संमिश्र यश :

  • टाटा स्टील जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेतील दुसरा दिवस पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदसाठी संमिश्र स्वरूपाचा ठरला. त्याने एक विजय मिळवला, एक सामना गमावला, तर एका सामन्यात बरोबरीत समाधान मानले.
  • ‘ग्रँड चेस टूर’ स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा प्राप्त झालेल्या या स्पर्धेत नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन तीन गुणांच्या फरकाने आघाडीवर आहे.
  • जलद प्रकाराच्या तीन आणि अतिजलद प्रकाराच्या 18 फेऱ्या बाकी असताना कार्लसनच स्पर्धेवर वर्चस्व गाजवण्याची चिन्हे आहेत.
  • कार्लसनने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे हिकारू नाकामुरा (अमेरिका) आणि अनिश गिरी (हॉलंड) यांना नामोहरम केले, तर भारताच्या विदित गुजराथीने त्याला बरोबरीत रोखले.

दिनविशेष:

  • 24 नोव्हेंबर हा दिवस ‘उत्क्रांती दिन‘ आहे.
  • सन 1434 मध्ये थेम्स नदी पूर्णपणे गोठली होती.
  • बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1961 मध्ये झाला.
  • कवी विंदा करंदीकर यांची सन 1992 मध्ये साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली होती.
  • समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना सन 1998 मध्ये प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.