24 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2020)
अमेरिकेत प्लाझ्मा थेरेपीद्वारे होणार करोनावर उपचार:
- करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अमेरिकेनं आता प्लाझ्मा थेरेपीद्वारे रुग्णांवर उपाचार करणार असल्याची घोषणा केली.
- करोनाबाधितांच्या उपचारासाठी आता प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
- अमेरिकेच्या एफडीएनंदेखील आपात्कालिन परिस्थितीत करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
- याद्वारे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत करोनाबाधितांचे प्राण वाचवले जाऊ शकतात, असा दावाही करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
रेल्वेने 2727 कोटींची रक्कम परत केली:
- करोना महासाथीमुळे रेल्वेने यावर्षीच्या मार्च महिन्यापासून 1.78 कोटी तिकिटे रद्द केल्या असून, 2727 कोटी रुपयांची रक्कम परत केली असल्याचे माहिती अधिकाराखालील विचारणेत उघड झाले आहे.
- २५ मार्चपासून प्रवासी रेल्वे सेवा रद्द केलेल्या रेल्वेने आतापर्यंत 1 कोटी 78 लाख 70 हजार 644 तिकिटे रद्द केल्याचीही माहिती यात मिळाली आहे.
- गेल्या वर्षी १ एप्रिल ते ११ ऑगस्ट या कालावधीत रेल्वेने 3660.08 कोटींची रक्कम परत केली होती, तर याच कालावधीत 17309.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.
- रेल्वेने तिकिटांच्या विक्रीतून मिळवलेल्या रकमेपेक्षा परताव्याची रक्कम जादा असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महात्मा गांधी यांचा चष्मा अडीच कोटी मध्ये विकला:
- इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा युकेमध्ये शुक्रवारी लिलाव झाला.
- या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये (2,60.000 पौंड) इतकी किंमत मिळली.
- युकेतील ब्रिस्टॉल येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ सहा मिनिटांमध्ये हे चष्मे तब्बल अडीच कोटी रुपयांना विकले गेले.
- एका अमेरिकन व्यक्तीने ज्याला जुन्या वस्तू जमवण्याचा छंद आहे, त्याने हे चष्मे विकत घेतले आहेत.
भारतात 73 दिवसांत येणार करोनाची लस:
- येत्या 73 दिवसांमध्ये ‘कोविशिल्ड’ नावाची कोविड-19 आजारावरील भारताची पहिली विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
- या लसीवर काम करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार याचे मोफत लसीकरण करणार आहे.
- या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून त्याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे.
- बिझनेस टुडेने सिरम इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
- केंद्राने आधीच एसआयआयला सूचित केले आहे की, ते थेट या लसी घेतील आणि भारतीयांना मोफत लसीकरण करण्याचा विचार करीत आहेत.
भारत उपांत्यपूर्व फेरीत- फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड:
- आर. प्रज्ञानंद आणि दिव्या देशमुख यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या बलाढय़ चीनचा 4-2 असा पराभव करत फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उपांत्यपूर्व फे रीतील आपले स्थान निश्चित के ले आहे.
- भारताचा उपांत्यपूर्व फे रीचा सामना 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.
- चार डाव बरोबरीत आणि 20 वर्षांखालील गटात दोन विजय मिळवत भारताने आगेकू च केली आहे.
- १५ वर्षीय प्रज्ञानंदने लियू यान याच्यावर सरशी साधली. त्यानंतर 10 आणि 12 वर्षांखालील माजी जगज्जेती दिव्या देशमुख हिने जिनर झू हिच्यावर विजय मिळवला.
- भारताने या विजयासह अ-गटात 17 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
दिनविशेष :
- 24 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन‘ आहे.
- सन 1690 मध्ये 24 ऑगस्ट रोजी कोलकाता शहराची स्थापना झाली.
- सन 1875 मध्ये कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
- स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म 24 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
- विक्रमवीर भारतीय जलतरणपटू ‘मिहिर सेन‘ यांनी सन 1966 मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
- सन 1995 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.