24 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 August 2019 Current Affairs In Marathi

24 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2019)

टेरर फंडिंग प्रकरणी FATF ने पाकिस्तानला टाकले काळ्या यादीत :

  • दहशतवादाला खतपाणी घालण्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. कारण, टेरर फंडिंगवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) एशिया पॅसिफिक ग्रुपच्या APG
    गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर ओढवलेली ही मोठी नामुष्की आहे.
  • भारतीय अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार एशिया पॅसिफिक अर्थात एपीजी गटाने पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट केले आहे.
  • तर आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्यासंबंधीचे जे मापदंड आहे त्यातल्या 40 पैकी 32 निकषांवर पाकिस्ताना अपयशी ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट म्हणजेच काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
  • तसेच गेल्या वर्षी पाकिस्तानला ग्रे यादीत टाकण्यात आले होते. ज्यानंतर पाकिस्तानने कृती आराखड्यानुसार काम करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरला. त्याचमुळे पाकिस्तानला काळ्या यादीत
    टाकण्यात आले आहे. आता ऑक्टोबर 2019 पर्यंत पाकिस्तानाला काळ्या यादीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2019)

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवर ‘वाडा’कडून सहा महिन्यांची बंदी :

  • जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) भारतामधील उत्तेजकविरोधी चळवळीला धक्का देताना राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. भारतामधील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला 2008 मध्ये ‘वाडा’ची मान्यता मिळाली होती. परंतु 20 ऑगस्टपासून त्यांचा उत्तेजक चाचणी घेण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.
  • तर टोक्यो ऑलिम्पिकसाठी एक वर्षांहून कमी कालावधी शिल्लक असताना हा भारताला मोठा धक्का बसला आहे.
  • राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) रक्त किंवा लघवीचे नमुने घेऊ शकते. परंतु त्यांच्या चाचणीसाठी त्यांना आता ‘वाडा’ची मान्यता असलेल्या देशाबाहेरील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
  • तसेच आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांच्या निकषांची पूर्तता राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेकडून होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नमुन्याच्या पृथक्करणाची पद्धतीसुद्धा योग्य पद्धतीने येथे होत नव्हती,’’ असे ‘वाडा’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे ‘विफा’च्या उपाध्यक्षपदी :

  • वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन या राज्य फुटबॉल संघटनेच्या नागपूर येथे शुक्रवारी झालेल्या 70व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गोंदिया जिल्ह्य़ाचे प्रफुल पटेल तसेच मुंबई जिल्ह्य़ाचे साऊटर वाझ यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि सचिवपदी फेरनिवड करण्यात आली.
  • मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि पालघर जिल्ह्य़ाचे पार्थ जिंदाल हे दोन नवे चेहरे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्याचबरोबर महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, हरेश व्होरा आणि विश्वजित कदम हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.

दिनविशेष :

  • 24 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन‘ आहे.
  • सन 1690 मध्ये 24 ऑगस्ट रोजी कोलकाता शहराची स्थापना झाली.
  • सन 1875 मध्ये कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
  • स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म 24 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
  • विक्रमवीर भारतीय जलतरणपटू ‘मिहिर सेन‘ यांनी सन 1966 मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
  • सन 1995 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.