23 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

कल्याण सिंह
कल्याण सिंह

23 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2021)

कल्याण सिंह कालवश :

  • उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले.
  • तर कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी पाडली, तेव्हा कल्याण सिंह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते.
  • मशीद पाडल्याप्रकरणी दोषमुक्त केलेल्या 32 जणांमध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह कल्याण सिंह यांचाही समावेश होता.
  • तसेच कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. दहावी-बारावीच्या परिक्षेत कॉपी करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करणारा कायदा त्यांनी मुख्यमंत्री असताना केला होता.
  • राजस्थान आणि हिमाचलच्या राज्यपालपदीही त्यांनी काम केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2021)

भारताला ऐतिहासिक तिसरे पदक :

  • भारताच्या शैली सिंगने रविवारी जागतिक युवा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रुपेरी पदकाची कमाई केली.
  • 17 वर्षीय शैलीचे पदक एक सेंटीमीटरच्या फरकाने हुकल्याचे शल्य ती लपवू शकली नाही. परंतु भारताने या स्पर्धेत प्रथमच एकूण तीन पदके जिंकण्याची किमया साधली.
  • तर शैलीने अंतिम फेरीमधील तिसऱ्या प्रयत्नात 6.59 मीटर अंतरावर उडी मारत आघाडी मिळवली.
  • परंतु स्वीडनच्या मॅजा अश्कागने चौथ्या प्रयत्नात 6.60 मीटर उडी घेत शैलीला मागे टाकले. मॅजाची हीच उडी सुवर्णपदकाची दावेदार ठरली. युक्रेनच्या मारिया होरीलोव्हाने कांस्यपदक पटकावले.

एलिन जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान धावपटू :

  • ऑलिम्पिक विजेत्या एलिन थॉम्पसन-हेराहने शनिवारी युजिन डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये महिलांच्या 100 मीटर शर्यतीमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ नोंदवली.
  • तर तिने ही शर्यत 10.54 सेकंदांत पूर्ण केली. सर्वोत्तम वेळेचा जागतिक विक्रम अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफिथ-जॉयनरच्या नावावर आहे.
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधणाऱ्या एलिन हिने शेली-अ‍ॅन फ्रेसर-प्रायसेला दोन-दशांश सेकंदांच्या फरकाने हरवून सर्वानाच धक्का दिला.
  • शेरिका जॅक्सनला तिसरा क्रमांक मिळवून या शर्यतीमधील जमैकाचे वर्चस्व सिद्ध केले.

दिनविशेष:

  • 23 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन‘ आहे.
  • सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध- जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा 23 ऑगस्ट 1918 रोजी धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म झाला.
  • सन 1991 मध्ये 23 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
  • कविवर्य विंदा करंदीकर यांना सन 2005 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.