22 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

22 September 2018 Current Affairs In Marathi

22 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 सप्टेंबर 2018)

डेबिट आणि क्रेडिट कार्ड अपग्रेड करणे अनिवार्य:

  • तुमचे जुने डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बदला, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अपग्रेड करणे आवश्यक आहे. अशा आशयाचे संदेश तुम्हाला तुमच्या मोबाइलवर आले असतील. तुम्ही हे मेसेज स्पॅम किंवा काहीतरी फसवणूक करणारे आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले असेल.
  • मात्र तसे करू नका, 31 डिसेंबरच्या आत तुम्ही तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अपग्रेड केले नाही तर ते बाद होणार आहे. त्यामुळे तुम्ही सध्या वापरत असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड जर बदलले नसेल तर ते लवकरात लवकर बदला.
  • (RBI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच बँकांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे बँका आपल्या खातेदारांना डेबिट कार्ड बदलण्यासंदर्भातले संदेश पाठवत आहेत. ATM Card
  • 31 डिसेंबरपर्यंत डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्ही अपग्रेड करून बदलले नाही तर आत्ता जे कार्ड वापरत आहात ते बाद होणार आहे. तुमच्या खात्यात तुमचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत.
  • ऑनलाइन फ्रॉडव्दारे ते चोरीला जाऊ नयेत म्हणून आरबीआयने यासंदर्भातले निर्देश बँकांना दिले आहेत. खातेदारांचे पैसे, ठेवी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेची आहे. त्यामुळे नव्या डेबिट कार्डांना विशिष्ट चीप्स लावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तुमची एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी आणि जास्त सुरक्षित होणार आहे.

आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण होणार:

  • सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केल्यानंतर आठवडाभरात आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बॅंक या तीन बॅंकांची मिळून नवीन जम्बो बॅंक अस्तित्वात येणार आहे.
  • गेल्या दोन वर्षांत भरमसाट बुडीत कर्जांमुळे सार्वजनिक बॅंकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. बहुतांश बॅंका तोट्यात असून सरकारवर भांडवल मदतीचा दबाव वाढत आहे. गेल्या वर्षी सरकारने भारतीय स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केले होते.
  • यामुळे स्टेट बॅंकेचा जगातील 50 बड्या बॅंकांमध्ये समावेश झाला. नुकतेच बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंक या तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आले.
  • सरकार विशाल बॅंकांबाबत आग्रही असून, त्यादृष्टीने आक्रमकपणे अर्थ खात्याकडून पडताळणी केली जात आहे. डिसेंबरअखेर पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स आणि आंध्र बॅंकेचे विलीनीकरण करण्यासंदर्भात या बॅंकांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर:

  • महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, तर आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.
  • दोन दिवसांपूर्वी दोघांची या पुरस्कारांसाठी शिफारस झाली होती. दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे 25 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचे वितरण होईल. Arjun Award
  • दरम्यान चौगुले यांनी न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. त्यानंतर 1970 व 1971 मध्ये महाराष्ट्र केसरी, 1973 मध्ये रुस्तम-ए-हिंद व महान भारत केसरीची गदा मिळविली. त्यांनी 1976 मध्ये राष्ट्रीय, तर 1978 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर अर्जुन पुरस्कारासाठी राहीची शिफारस झाली होती. तिने यापूर्वी 2008 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2010 मधील राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण व रौप्य, तर 2014 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. 2013 मध्ये दक्षिण कोरियातील विश्‍वचषक नेमबाजीत सुवर्ण, तर 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली आहे.

रशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध:

  • भारतरशियाकडून 450 कोटी डॉलर्स खर्चून ‘एस-400‘ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.
  • पण रशियन व्देषामुळे ही क्षेपणास्त्र खरेदी अमेरिकेला खुपत आहे. त्यामुळे त्यांनी भारतावर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे. S-400
  • भारत-रशिया संरक्षण संबंधांतर्गत भारत ही खरेदी करीत आहे. अशीच खरेदी चीननेही केली होती. पण त्यानंतर अमेरिकेने चीनवर आर्थिक निर्बंध आणले.
  • चिनी मालाच्या आयातीवर अमेरिकेने भरमसाट शुल्क लावले. त्याचा चिनी बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला. असेच निर्बंध आता अमेरिका भारतावर आणू पाहत आहे.

दिनविशेष:

  • सन 1660 मध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
  • सन 1888 मध्ये द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • सन 1995 मध्ये भारतीय नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • सुनील गावसकर यांना सन 1998 मध्ये महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर झाला.
  • सन 2003 मध्ये नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.