22 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

22 October 2018 Current Affairs In Marathi

22 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2018)

‘आयएनएफ’ करारातून अमेरिका बाहेर :

 • शीतयुद्धाच्या काळापासून रशियाबरोबर करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेने माघार घेण्याचेCठरवले आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.
 • तर या करारानुसार दोन्ही देशांकडे किती क्षेपणास्त्रे असावीत यावर काही मर्यादा होत्या, पण रशियाने या कराराचे पालन केले नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
 • ‘दी इंटरमिजिएट रेंज न्यूक्लियर फोर्सेस ट्रीटी’ म्हणजे आयएनएफ करार हा शस्त्रास्त्र नियंत्रण करारापैकी एक असून तो दोन वर्षांत संपुष्टात येत आहे.
 • तसेच 1987 मध्ये करण्यात आलेल्या या करारात अमेरिका व त्याच्या युरोप तसेच अतिपूर्वेकडील मित्रदेशांच्या संरक्षणाचा हेतू होता.
 • तर या करारानुसार अमेरिका व रशिया यांना 300 ते 3400 मैल पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करणे, त्याची चाचणी करणे, ती बाळगणे यावर प्रतिबंध होता.

शिमला शहराचेही नामांतर होणार :

 • भारतातील नावे बदललेल्या शहरांच्या यादीत लवकरच शिमल्याचाही क्रमांक लागण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमला शहराचे नाव ‘श्यामला’ करण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजप सरकार विचार करत आहे.
 • हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे नामांतर करावे, अशी मागणी करणारी मोहीम काही उजव्या विचारांच्या हिंदू संघटनांनी सुरू केली आहे. त्यावर, नाव बदलण्याच्या मागणीबाबत सरकार जनतेच्या भावना जाणून घेणार असल्याचे मुख्यमंत्री
  जयराम ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
 • देशाच्या निरनिराळ्या भागांतील अनेक शहरांना त्यांची ऐतिहासिक नावे होती, मात्र ती बदलण्यात आली. त्यामुळे त्यांना त्यांची जुनी नावे पुन्हा देण्यात काही हरकत नाही. त्यामुळे शिमल्याच्या लोकांना शहराचे नाव बदलून ‘श्यामला’ हवे असेल, तर या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो, असे भाजपचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री विपिन सिंह परमार यांनी सांगितले.
 • तर शहराचे नाव बदलल्यास शहरातील रिज, स्कँडल पॉइंट, पीटरहॉप, डलहौसी इ. ठिकाणांची नावेही बदलली जाऊ शकतात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2018)

रविंद्र जाडेजाची पत्नी गुजरात करणी सेनेच्या महिला विभाग प्रमुखपदी :

 • भारतीय संघाचा क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची गुजरातच्या करणी सेनेच्या महिला प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तर करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराणा यांनी रिवाबाची महिला विभाग अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
  गुजरातच्या ग्रामीण भागातील महिलांचं सबलीकरण करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे आपलं प्रमुख उद्दीष्ट असल्याचं रिवाबाने स्पष्ट केलं.

कॅप्टन कोहलीने केला नवा विक्रम :

 • पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्याvirat Kohaliजोरावर विंडीजने भारतापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले.
 • आशिया चषक स्पर्धेतील विश्रांतीनंतर त्याने एकदिवसीय संघात पुनरागमन केले. हे पुनरागमन दणक्यात तर झालेच, पण महत्वाचे म्हणजे यासह विराटने आणखी एक पराक्रम केला.
 • विराटने फटकेबाजी करत वन डे कारकीर्दीतील 49 वे अर्धशतक पूर्ण केले आहे.
 • तर या कामगिरीसह त्याने 2018 या वर्षातील क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून 2000 धावा करण्याचा विक्रम केला आहे.
 • तसेच यंदाच्या वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
 • विराटने सलग दुसऱ्या वर्षी हा पराक्रम केला आहे. त्याने गेल्या वर्षी 2818 धावा केल्या होत्या. 2018 साली वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट चौथ्या स्थानावर आहे.
 • तर त्याने 10 सामन्यांत 813 धावा केल्या आहेत. या क्रमवारीत पहिले तीनही फलंदाज इंग्लंडचेच आहेत.

मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक :

 • रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.Mukesh Ambani
 • मायक्रोसॉफ्ट कंपनीचे माजी चेअरमन स्टिव्ह बॉलमेअर यांना मागे टाकत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत क्रीडा संघ मालक ठरले आहेत. तर फोर्ब्स मासिकाने ही यादी जाहीर केली आहे.
 • बीसीसीआयच्या इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने मुंबई इंडियन्स या संघाची मालकी स्विकारली आहे.
 • तसेच गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाला मोठा आर्थिक फायदा झाला होता. ज्यामुळे रिलायन्सचे शेअर्स हे चांगले वाढले होते. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी हे भारतातले पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 199 वा क्रमांक आहे.
 • तर अंबानी यांच्या आधी ‘लॉस एंजलिस क्लिपर्स’ या बास्केटबॉल संघाचे मालक स्टिव्ह बॉलमेअर हे आघाडीवर होते, मात्र बॉलमेअर यांना मागे टाकत अंबानी यांना हा मान पटकावला आहे.

चंद्रावरील उल्काखंडाचा 6 लाख डॉलरला लिलाव :

 • चंद्रावरून पृथ्वीवर आलेल्या सुमारे साडेपाच किलो वजनाच्या उल्काखंडाची अमेरिकेतील ‘आरआर ऑक्शन’ या कंपनीने आयोजित केलेल्या लिलावात 6 लाख 12 हजार 500 डॉलरना विक्री झाली.
 • तर हा उल्काखंड एकूण सहा तुकड्यांचा मिळून बनलेला असून हे सहा तुकडे एकमेकांमध्ये घट्ट अडकलेले आहेत.
  वायव्य आफ्रिकेतील वाळवंटात गेल्या वर्षी मिळालेला हा उल्काखंड ‘एनडब्ल्यूए 11789’ या संकेत क्रमांकाने अधिकृतपणे ओळखला जातो; पण व्यवहारात त्याचे आफ्रिकी भाषेतील ‘बुगाबा’ (चांद्रिय कोडे) हे टोपणनाव रुढ आहे.
 • तसेच कित्येक हजार वर्षांपूर्वी अन्य एका मोठ्या उल्केने चंद्राला धडक दिली तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागाचा हा तुकडा निखळून वेगळा झाला व सुमारे अडीच लाख किमी प्रवास करून पृथ्वीवर पोहोचला, असे मानले जाते.
 • मात्र, तुलनेने खूपच लहान असलेला हा उल्काखंड येताना वातावरणाच्या घर्षणाने जळून खाक कसा झाला नाही, हे मात्र न सुटलेले कोडे आहे.

दिनविशेष :

 • 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन
 • 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
 • 22 ऑक्टोबर 4004 मध्ये ई. पू. उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
 • निकोला टेस्ला यांनी 22 ऑक्टोबर 1927 मध्ये सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
 • पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर 1963 मध्ये भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
 • 22 ऑक्टोबर 2008 मध्ये भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.