22 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2020)
चार मोठ्या बँकांचे लवकरच होणार खासगीकरण:
- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हलचाली सुरु केल्या आहेत.
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी निश्चित केली आहे. - या यादीमध्ये पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय़ बँक या चार महत्वाच्या बँकाचा समावेश आहे.
- पैसा उभारण्यासाठी आणि सरकारी बँकांची परिस्थिती स्थीर ठेवण्यासाठी सरकाराने सार्वजनिक क्षेत्रातील पाचच बँकांमध्ये गूंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
- या वर्षाअखेरीस पर्यंत या बँकांचे खासगीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Must Read (नक्की वाचा):
सैन्याला पहिले 50 लाख डोस देण्याचा मोदी सरकारचा विचार:
- भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात 50 लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे.
- केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे.
- केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे.
- केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची योजना आखत आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोना लस पोहोचावी.
- वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोना लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाईल:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजूरी दिली आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव बदलून ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ असं होईल अशी खोचक टीका केली आहे.
- मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विमानतळांचा कारभार अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे सलग तीन विजय:
- भारताने ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या दिवशी झिम्बाब्वे, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तान यांना नमवत सलग तीन विजयांची नोंद केली.
- भारताने पहिल्या लढतीत झिम्बाब्वेला 6-0 असे सहज हरवले. मग व्हिएतनामवर 4-2 असा आणि उझबेकिस्तानवर 5.5-0.5 असा विजय मिळवला.
- सलग तीन विजयांमुळे भारत आणि चीन यांनी प्रत्येकी सहा गुण कमावले आहेत.
दिनविशेष:
- ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ने 22 ऑगस्ट 1639 रोजी मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
- सन 1848 मध्ये अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
- सन 1902 मध्ये कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना झाली.
- हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म 22 ऑगस्ट 1920 मध्ये झाला.
- वर्णव्देषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची 22 ऑगस्ट 1972 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.