21 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
21 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 नोव्हेंबर 2018)
केरळ काँग्रेसचे अध्यक्ष एम. आय. शनवास यांचे निधन
- केरळ काँग्रेसचे विद्यमान कार्यवाहक अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील खासदार एम. आय. शनवास यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते.
- तसेच 1983 पासून शनवास हे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
- तर 2009 पासून अद्यापपर्यंत ते वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आले होते.
- केरळमधील विद्यार्थी संघटनेतून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी यापूर्वी युथ काँग्रेस आणि सेवा दलात काम केले आहे.
भारत, रशियामध्ये 500 दशलक्ष डॉलरचा युद्धनौकाबांधणी करार :
- भारत आणि रशिया यांच्यात दोन युद्धनौकाबांधणीसाठी 500 दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. तर या नौकांची बांधणी गोवा येथील नौदल गोदीत करण्यात येणार आहे.
- तसेच रशिया त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.
- गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि रशियाची रोझोबोरॉनएक्स्पोर्ट यांच्यात हा 500 दशलक्ष डॉलरचा करार झाला. त्यानुसार रशिया भारताला दोन युद्धनौकाबांधणीसाठी तंत्रज्ञान आणि सामग्री पुरवणार आहे.
- तर या नौकांच्या बांधणीला 2020 मध्ये सुरुवात होईल. त्यातील पहिली युद्धनौका 2026 साली आणि दुसरी नौका 2027 साली तयार होईल.
- तसेच या तलवारवर्गातील स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे बसवण्यात येतील.
Must Read (नक्की वाचा):
मेरी कोमचे पदक निश्चित :
- World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
- तसेच मेरी कोमच्या या विजयामुळे तिचे जागतिक स्पर्धेमध्ये आणखी एक पदक निश्चित झाले आहे.
- या स्पर्धेत एमसी मेरी कोमने रविवारी 48 किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कझाकस्तानच्या एयगेरिम केसेनायेव्हाचा 5-0 असा पराभव केला होता.
- तर त्या विजयाने तिने सहाव्या जागतिक सुवर्णपदकाकडे वाटचाल करण्यास आणखी एक पाऊल टाकले होते.
महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार :
- केंद्र सरकारच्या 2018 सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. नाशिकचा जलतरणपटू स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- राज्यातील 6 व्यक्ती आणि 3 संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते 3 डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
- मूळच्या अमरावतीच्या व जन्मांध असलेल्या कांचनमाला पांडे हिने मेक्सिकोच्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-2017 स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते.
दिनविशेष :
- 21 नोव्हेंबर – जागतिक टेलीव्हिजन दिन
- 21 नोव्हेंबर 1877 मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
- 21 नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
- दक्षिण कोरियाने 21 नोव्हेंबर 1972 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा