21 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन

21 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 मे 2020)

जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मानाचं स्थान :

 • जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे.
 • तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच ते 22 मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
 • डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
 • तर या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते.
 • तसंच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर तसंच धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मे 2020)

12 हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाची निर्मिती :

 • भारतीय रेल्वेनं देशातल्या सर्वात शक्तिशाली इंजिनाची निर्मिती केली आहे.
 • तर बिहारच्या मधेपुरा रेल्वे कारखान्यात शक्तिशाली एसी इलेक्ट्रिक इंजिन तयार करण्यात आलं आहे.
 • तब्बल 12 हजार हॉर्सपॉवरची क्षमता असणारं अतिशय वेगानं धावू शकतं. पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन भागात इंजिनाची पहिली चाचणी घेण्यात आली.
 • पहिल्या चाचणीत इंजिनानं मालगाडीचे 118 डबे यशस्वीपणे खेचले. चाचणी दरम्यान इंजिनानं पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन ते झारखंडच्या बरवाडीह दरम्यानचं 276 किलोमीटर अंतर कापलं.
 • मधुपेरामधल्या रेल्वे कारखान्यात देशातल्या सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली इंजिनाची निर्मिती करण्यात आली. यासाठी 19 हजार कोटी रुपयांचा खर्च आला.
 • तर ऑक्टोबर 2017 पासून या इंजिनाच्या निर्मितीवर काम सुरू होतं. शक्तिशाली इंजिनाच्या यशस्वी प्रयोगामुळे भारताच्या नावापुढे ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे.
 • तसेच जास्त हॉर्सपॉवरच्या इंजिनाची देशातच निर्मिती करणाऱ्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. याआधी अशी कामगिरी केवळ पाच देशांना जमली आहे. जास्त हॉर्सपॉवर असलेल्या इंजिनाची ब्रॉड गेजवर चाचणी घेणारा भारत पहिला देश ठरला आहे.

देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून :

 • देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सोमवार, 25 मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी जाहीर केले.
 • मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा कधी सुरू होईल, याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
 • विमानसेवा हिरव्या श्रेणीतील शहरांमध्ये सुरू केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु, चेन्नई आदी महानगरांमध्ये ही सेवा सुरू करायची असेल तर राज्य सरकारांचे मतही विचारात घेतले जाऊ शकते.
 • तसेच करोनाकालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील व त्यांची माहिती यथावकाश दिली जाईल, असे पुरी यांनी सांगितले.

यूपीएससी पूर्व परीक्षेच्या तारखेची घोषणा 5 जूनला:

 • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा पूर्व परीक्षेची तारीख 5 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
 • तर टाळेबंदीमुळे 31 मे रोजीची ही नियोजित पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.
 • लोकसेवा आयोगाने बुधवारी परिस्थितीचा आढावा घेतला. टाळेबंदीच्या नव्या टप्प्यातही अनेक र्निबध कायम ठेवण्यात आलेले असल्याने सद्य:स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही.
 • त्यामुळे 5 जून रोजी आयोगाची पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात आढावा घेऊन परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले.

दिनविशेष:

 • 21 मे 1881 मध्ये वॉशिंग्टन (डी.सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.
 • पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना 21 मे 1904 रोजी झाली.
 • पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे 21 मे 1991 रोजी आत्मघातकी पथकाने हत्या केली.
 • 21 मे 1994 मध्ये 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मे 2020)

You might also like
1 Comment
 1. Rohan Khaire says

  Thanks for sharing daily update on current affairs…

Leave A Reply

Your email address will not be published.