20 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला:
मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला:

20 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 जुलै 2020)

मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला:

 • संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. जपानच्या मदतीने युएईने ‘होप मार्स मिशन’चे जपानच्या तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन यशस्वी प्रक्षेपण केलं.
 • त्यामुळेच मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.
 • स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी यान प्रक्षेपीत करण्यात आलं. पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात हे यान मंगळाच्या दिशेने प्रवास करेल.
 • त्यानंतर 2021 मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे याने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. 1.3 टन वजनाचे हे यान 50 कोटी किमीचे अंतर पार करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 जुलै 2020)

नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला- केंद्र सरकार:

 • केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी रात्रपाळी भत्ता म्हणजेच नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • यासंदर्भात कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT- Department of Personnel and Training) निर्देश जारी करत माहिती दिली आहे.
 • हे निर्देश 13 जुलै रोजी जारी करण्यात आले असून त्यांची अंलबजावणी 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात आली आहे.
 • या नव्या नियमांनुसार केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या व्यवस्थेनुसार विशेष ग्रेड पेवर आधारित नाइट ड्यूटी अलाउंस बंद केला आहे.
 • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याआधी ग्रेड पेच्या आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाइट ड्यूटी अलाउंस दिला जायचा.

खासगी रेल्वे गाडय़ा 2023 मध्ये धावणार:

 • रेल्वेने खासगी गाडय़ांचे वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार पहिल्या ताफ्यातील 12 गाडय़ा 2023 मध्ये धावणार आहेत.
 • आर्थिक वर्षांत आणखी 45 तर सर्व 159 खासगी गाडय़ांची सेवा 2027 मध्ये सुरू केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • खासगी कंपन्यांना प्रवासी गाडय़ांची सेवा सुरू करण्याची औपचारिक सुरुवात झाली असून रेल्वेने या महिन्याच्या पूर्वार्धात कंपन्यांकडून 109 दुहेरी मार्गावर 151 प्रवासी गाडय़ा चालविण्यासाठी प्रस्ताव मागविले होते.
 • या प्रकल्पात खासगी क्षेत्रातील 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
 • खासगीकरणाच्या योजनेचा एक भाग म्हणून 12 गाडय़ांचा पहिला ताफा 2022-23 मध्ये, दुसरा 45 गाडय़ांचा ताफा 2023-24 मध्ये, तिसरा 50 गाडय़ांचा ताफा 2025-26 मध्ये आणि त्यापुढील आर्थिक वर्षांत 44 गाडय़ांचा ताफा असा एकूण 151 गाडय़ांचा ताफा 2026-27 मध्ये सुरू केला जाणार आहे.

भारतात एकूण सात औषध कंपन्या करोनावर लस तयार करण्यात गुंतल्या:

 • भारतात एकूण सात औषध कंपन्या करोनावर लस तयार करण्यात गुंतल्या असून जागतिक पातळीवरही लशीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
 • भारत बायोटेक, सिरम इन्स्टिटय़ूट, झायडस कॅडीला, पॅनाशिया बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स. मिनव्ॉक्स, बायोलॉजिकल-इ या देशी कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील असून लस तयार करण्यासाठी खरेतर काही वर्षे लागतात, पण करोनाचा वाढता प्रसार बघता ती कमी कालावधीत उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत.
 • भारत बायोटेकला टप्पा 1 व 2 चाचण्यांसाठी परवाना देण्यात आला आहे. त्यांची कोव्हॅक्सीन ही लस तयार आहे. ती हैदराबाद येथे तयार करण्यात आली आहे. त्यांनी मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत.
 • सिरम इन्स्टिटय़ूट या पुण्यातील संस्थेने वर्षअखेरीस लस येईल असे म्हटले आहे.
 • अ‍ॅस्ट्रॉझेन्का ऑक्सफर्ड लशीचे उत्पादन ही कंपनी करणार आहे. त्या लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात असून ती सप्टेंबरमध्येच बाजारात आणली जाईल, असे ब्रिटनमधून आलेल्या बातम्यांत म्हटले होते.

6 कोटी लोक नरेंद्र मोदी यांना टि्वटरवर फॉलो करतात:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटरवर झेप घेतली असून, केवळ दहा महिन्यांमध्ये त्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येत 1 कोटी लोकांची भर पडली आहे.
 • आपल्या प्रत्येक निर्णयाची, विविध विषयांची माहिती सतत मोदी टि्वटद्वारे देत असतात. नरेंद्र मोदी जेव्ही गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून म्हणजेच 2009 पासूनच त्यांचं टि्वटर हँडल चांगलंच अॅक्टिव्ह आहे.
 • सध्या मोदी जागतिक नेत्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येनुसार तिसऱ्या स्थानावर आहेत. सध्या या यादीत बराक ओबामा पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मोदींपेक्षाही दुप्पट आहे.
 • सध्या 12 कोटी लोक बराक ओबामा यांना टि्वटरवर फॉलो करतात. नरेंद्र मोदी यांना 6 कोटी लोक टि्वटरवर फॉलो करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 8.3 कोटी आहे.

डेक्सॅमिथेसोन हे औषध जास्त उपयोगी:

 • ब्रिटिश संशोधकांनी अलीकडेच यावर सर्वागीण अभ्यास केला असता त्यातील डेक्सॅमिथेसोन हे औषध कोविड 19 ची लागण झाल्यानंतर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जास्त उपयोगी असल्याचे दिसून आले आहे.
 • कमी लक्षणे असलेल्या रुग्णात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध उपयोगी ठरत असल्याचे इतर दोन अभ्यासात दिसून आले आहे.
 • डॉ अँथनी फॉसी, डॉ. एच. क्लिफोर्ड लेन यांनी दी न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलमध्ये याबाबत लेख लिहिला असून त्यांच्या मते कोविड 19 साथीवर विश्वासार्ह उपचार शोधण्यासाठी संशोधनाची प्रक्रिया गरजेची आहे.
 • 2104 रुग्णांना ते देण्यात आले. इतर 4231 रुग्णांना नेहमीचे उपचार दिले. त्यात ज्यांना व्हेन्टिलेटरची गरज होती अशा 36 टक्के लोकांचे प्राण वाचले.
 • या औषधाचा वापर केलेल्यांत मृत्यूचे प्रमाण 29 टक्के ,तर वापर न केलेल्यात 41 टक्के होते, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.

भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णला 2020 चे विजेतेपद:

 • भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत सात फेऱ्यांमध्ये 505 गुणांची कमाई करत 53व्या बाएल बुद्धिबळ महोत्सव 2020चा भाग असलेल्या अ‍ॅसेंटस बुद्धिबळ 960 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 • हरिकृष्ण सात फेऱ्यांमध्ये अपराजित राहिला. पोलंडच्या रॅडोस्लाव्ह वोतासेक याचा शेवटच्या फेरीतील पराभव हरिकृष्णच्या पथ्यावर पडला.
 • स्वित्र्झलडच्या नोएल स्टडरने त्याला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे हरिकृष्णला अव्वल स्थानी मजल मारता आली.
 • जर्मनीच्या विन्सेन्ट के यमेर या 15 वर्षीय बुद्धिबळपटूने सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत 5 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. वोतासेकला 4.5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दिनविशेष :

 • 20 जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन‘ आहे.
 • सन 1828 या वर्षी मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
 • बडोद्याचे महाराज सर सायाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने सन 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
 • सन 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.