20 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

पॅरिस सेंट जर्मेन प्रथमच अंतिम फेरीत:
पॅरिस सेंट जर्मेन प्रथमच अंतिम फेरीत:

20 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2020)

करोना रुग्णांची वाढ पुन्हा 60 हजारांपेक्षा जास्त झाली:

 • करोना रुग्णांची दैनंदिन वाढ पुन्हा 60 हजारांपेक्षा जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये 64 हजार 500 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 1,094 रुग्णांचा मृत्यू झाला.
 • देशभरातील करोना रुग्णांचा आकडा 27 लाख 67 हजार 273 वर तर, मृत्यू 52 हजार 889 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
 • गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी 60 हजार 91 रुग्ण करोनामुक्त झाले असून एकूण 20 लाख 37 हजार 870 रुग्ण बरे झाले आहेत.
 • रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही सर्वाधिक 73.64 टक्क्यांवर गेले आहे. संसर्ग दर 8.05 टक्के असून मृत्यू दर 1.91 टक्के आहे. करोनाबाधितांपैकी 24.45 टक्के म्हणजेच चारमध्ये एक रुग्ण उपचाराधीन आहे.
 • एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 6 लाख 76 हजार 514 आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2020)

National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल- मोदी सरकार:

 • सरकारी नोकरीबाबत मोदी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल.
 • त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते.
 • प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात.
 • मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली.

पॅरिस सेंट जर्मेन प्रथमच अंतिम फेरीत:

 • पॅरिस सेंट जर्मेनने सुरुवातीपासूनच दर्जेदार कामगिरीचे प्रदर्शन करत आरबी लेपझिग संघाचा 3-0 असा पाडाव करत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली.
 • चॅम्पियन्स लीगमधील तब्बल 110 सामन्यांमध्ये खेळल्यानंतर फ्रान्समधील अव्वल क्लब असलेल्या पॅरिस सेंट जर्मेनचे अंतिम फे रीत मजल मारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले.
 • मार्किन्होज, अँजेल डी मारिया तसेच हुआन बेर्नाट वेलास्को यांनी केलेल्या गोलमुळे पॅरिस सेंट जर्मेनने उपांत्य फे रीच्या लढतीवर वर्चस्व गाजवले.
 • पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठणाऱ्या लेपझिगविरुद्ध पॅरिस सेंट जर्मेनने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवले.
 • अप्रतिम पासेस, मोकळ्या जागेतून धावत चेंडूला पुढे सरकावणे आणि लेपझिगच्या बचावफळीवर सातत्याने दडपण आणत पॅरिस सेंट जर्मेनने हा सामना सहज जिंकला.

दिनविशेष:

 • 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिन तसेच भारतीय अक्षय ऊर्जा दिन आहे.
 • राजाराममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी 20 ऑगस्ट सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
 • सर रोनाल्ड रॉस यांनी सन 1897 मध्ये भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
 • भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट 1944 मध्ये मुंबई येथे जन्म झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.