2 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 नोव्हेंबर 2018)

2 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 नोव्हेंबर 2018)

रिझर्व्ह बँकेने केली विक्रमी सोने खरेदी:

 • डॉलरसमोर रुपया सातत्याने घसरत असल्याने बाजारात मंदी असताना रिझर्व्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 148.40 टन इतक्या सोन्याची विक्रमी खरेदी केली. तीन महिन्यांच्या कालावधीतील बँकेची 2015 नंतर ही सर्वाधिक खरेदी आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने ही माहिती दिली. RBI
 • कौन्सिलच्या सोमसुंदरम यांनी सांगितले की, भारतासह बहुतांश विकसनशील देशांमधील प्रधान बँकांनी डॉलरकेंद्रित अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात आर्थिक मंदी निर्माण झाल्यास डॉलर विक्रीऐवजी सोने विक्रीतून पैसा उभा करण्याची सोय बँकांनी केली आहे. या सोने खरेदीत जुलै-सप्टेंबर 2017 च्या तुलनेत यंदा 22 टक्के वाढ झाली आहे. रशिया, कझाकिस्तान, तुर्कस्थानमधील बँकांनीही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे.
 • जानेवारी ते सप्टेंबर 2018 या कालावधीत जगभरात 3809 टन सोन्याची विक्री झाली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.51 टक्के अधिक आहे. दागिन्यांच्या मागणीत चांगली वाढ झाली. पण भांडवली बाजाराशी संबंधित ‘ईटीएफ’ द्वारे होणाऱ्या सोने गुंतवणुकीत जवळपास 21 टक्के घट झाली.
 • सोमसुंदरम यांनी सांगितले की, जुलै ते सप्टेंबर 2017 च्या तुलनेत यंदा भारतात सोन्याची विक्री 10 टक्के वाढली. पण जानेवारी ते सप्टेंबर या सहा महिन्यांचा विचार केल्यास मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा विक्री 1 टक्का घटली आहे.

आयएनएस विराटचे होणार वस्तूसंग्रहालय:

 • गौरवशाली इतिहास असणारी आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार 852 कोटी खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वातून राबविण्यात येणार आहे.
 • आयएनएस विराट युद्धनौका मार्च 2017 मध्ये भारतीय नौसेनेतून निवृत्त झाली. सध्या ती नौसेनेच्या गोदीमध्ये (नेव्हल डॉकयार्ड) ठेवण्यात आली आहे.
 • भारतीय नौसेनेचा समृद्ध इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा तसेच तरुणांमध्ये सागरी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी, या हेतूने विराटचे वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता.
 • राज्य सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्रालयास सादर केलेल्या प्रस्तावानुसार, ही नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्‍स येथे किनाऱ्यापासून सात सागरी मैल अंतरावरील समुद्रात कॉंक्रीटची पायाभरणी करून स्थापित करण्यात येईल. तसेच या ठिकाणी असलेले वैविध्यपूर्ण सागरी जैवविश्‍व पर्यटकांना पाहता येणार आहे.

राहुल द्रविडचा आयसीसीच्या Hall of Fame मध्ये समावेश:

 • भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द घडणवणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना ICCच्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. Rahul Dravid
 • भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामना केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे सुरु आहे. या सामन्याआधी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
 • क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला.

सरकारी तिजोरीत एक लाख कोटी रुपयांचा जीएसटी:

 • ऑक्टोबर महिन्यांत वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून (जीएसटी) सरकारच्या तिजोरीत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे.
 • अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सरकारच्या अपेक्षेप्रमाणे हे उत्पन्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यानंतरच्या सहामाहीत जीएसटीची ही मिळकत पुन्हा एकदा एक लाख कोटींच्या पार गेली आहे. तर मे पासून ऑगस्टपर्यंत ही मिळकत 90 कोटींपेक्षा अधिक होती.
 • जेटली म्हणाले की, इतका चांगला महसूल मिळण्यामागील मोठे कारण म्हणजे कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे होय. या सकारात्मक उपाय योजनांमुळे हे यश सरकारला मिळाले आहे. सरकारी तिजोरीतील ऑगस्टमधील जीएसटीची मिळकत 93,690 कोटी रुपये होती.
 • या आठवड्यात सरकारला अर्थव्यवस्थेसंदर्भात दोन चांगल्या बातम्या मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे उद्योग सुलभतेत भारताच्या क्रमवारीत 50 स्थानांनी सुधारणा होऊन भारत 77व्या क्रमांकावर पोहोचला. तर दुसरी बाब म्हणजे जीएसटीच्या महसुलात झालेली विक्रमी वाढ.
 • जागतिक बँकेच्या माहितीनुसार, मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आले त्यावेळी भारताचा उद्योग सुलभतेबाबत 142वा क्रमांक होता. त्यानंतर पंतप्रधानांनी पुढील वर्षात भारताचे टॉपच्या 50 देशांच्या खास यादीत स्थान मिळवायचे लक्ष्य ठेवले होते.

विराटचे आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान कायम:

 • कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियाने 1 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. VK
 • भारताने कसोटी मालिकेत आठव्या स्थानावरील विंडीजला 2-0 ने पराभूत केले. त्यामुळे भारताचे 116 तर दुसऱ्या स्थानावरील द. आफ्रिकेचे 106 गुण आहेत.
 • तसेच कोहली 935 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टीव्ह स्मिथपेक्षा (910) 25 गुणांनी पुढे आहे. तर चेतेश्वर पुजारा 765 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

सोन्याचा भाव पाच वर्षांच्या उच्चांकावर:

 • दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे आणि अशात म्हणजेच ऐन दिवाळीत सोन्याचा भाव पाच वर्षांच्या उच्चांकीवर पोहचला आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या मोसमात सोन्याची मागणी मागच्या वर्षाच्या तुलनेत घटल्याने ही दरवाढ बघायला मिळते आहे.
 • 10 ग्रॅम सोन्याचा दर 33 हजार 101 रुपये आहे. हा दर 24 कॅरेट सोन्यासाठीचा प्रति दहा ग्रॅमचा दर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 30 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे.
 • गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.5 टक्क्यांनी सोन्याची मागणी घटली आहे. तसेच दसरा आणि दिवाळीच्या मोसमात सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून येतो. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ही मागणी घटल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे.

दिनविशेष:

 • 2 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय आगमन दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1833 मध्ये झाला.
 • महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1882 मध्ये झाला.
 • ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सन 1936 मध्ये सुरू केली.
 • सन 1936 मध्ये कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.
 • पाकिस्तानातील असेंब्लीने 2 नोव्हेंबर सन 1953 रोजी देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठेवले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.