19 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
19 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 सप्टेंबर 2020)
गुगलने प्ले स्टोअर वरून Paytm काढून टाकले:
- ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे लोकप्रिय अॅप्लिकेशन गुगलने आपल्या प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकले आहे.
- मात्र या कारवाईमुळे हे अॅप वापरणाऱ्या 45 कोटी युझर्सच्या पैशांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
- हे अॅप वापरणाऱ्या युझर्सला काळजी करण्याची गरज नसून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे लवकरच आम्ही परत या प्लॅटफॉर्मवर येऊ असं म्हटलं आहे.
- हे सर्व गुगलच्या नियमांमध्ये बसणारे नाही असं सांगत गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अॅपवरही कारवाई केली आहे.
Must Read (नक्की वाचा):
वायव्य चीनमध्ये (brucellosis) संसर्ग तीन, हजार 235 रुग्ण आढळून आले:
- वायव्य चीनमध्ये ब्रुसेलोसिसचा (brucellosis) संसर्ग झालेले हजारो रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
- एका औषध निर्मिती कंपनीमधून लीक झालेल्या रसायनांमुळे विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराचे हजारो रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
- गान्सू प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रुसेलोसिसचे तीन हजार 235 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रुसेला या विषाणुमुळे हा आजार होतो असं सांगण्यात आलं आहे.
- 24 जुलै 2019 ते 20 ऑगस्टदरम्यान झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये लस निर्मिती करण्याचं काम केलं जात होतं.
- लॅन्झू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ असणाऱ्या या कारखान्यामध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला विषाणुंच्या मदतीने औषधांची निर्मीत करण्यात येत होती.
- याच औषध निर्मितीदरम्यान कारखान्यातील धूर आणि गॅस प्रक्रिया न करता तो बाहेर सोडण्यात आला. त्यामधूनच लोकांना आता आजाराची बाधा झाली आहे.
विराट-रोहित अव्वल स्थानी कायम:
- भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे.
- तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला आहे. गुरुवारी आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली.
- आयसीसीनं जाहिर केलेल्या यादीत विराट 871 गुणांसह पहिल्या तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह 719 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
दिनविशेष :
- भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा 19 सप्टेंबर 1965 रोजी क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म झाला.
- सन 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
- गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना सन 2001 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
- सन 2007 मध्ये टी-20 क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
great thing take so great platform are u providing for competative aspirant,thank you