19 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती
छत्रपती शिवाजी महाराज जयंती

19 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 फेब्रुवरी 2020)

देशाच्या पश्चिम, उत्तर सीमांवर नवे संयुक्त लष्करी कमांड :

 • भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हाने लक्षात घेऊन देशाच्या पश्चिम व उत्तर सीमांवर दोन ते पाच संयुक्त लष्करी कमांड स्थापन केले जातील आणि अशा प्रकारची पहिली रचना 2022 पर्यंत कार्यरत केली जाईल, असे सांगून संरक्षणप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताची  सामरिक व्यूहात्मक बदलांची संरचना उघड केली.
 • तर सध्याच्या संरचनेत आमूलाग्र बदल करून, जम्मू- काश्मीरमधील सुरक्षाविषयक आव्हाने हाताळण्यासाठी तेथे एक स्वतंत्र संयुक्त लष्करी कमांड स्थापन केले जाईल, अशीही माहिती जनरल रावत यांनी दिली.
 • तसेच जुन्या झालेल्या लष्करी सामुग्रीच्या समस्येवर उपाय म्हणून 114 लढाऊ जेट विमानांसारखी मोठी खरेदी करण्याबाबत नवे धोरण स्वीकारण्यात येत असल्याचेही जनरल रावत यांनी पत्रकारांना सांगितले.
 • भारतीय नौदलाच्या पूर्व आणि पश्चिम कमांडचे विलीनीकरण करून प्रस्तावित द्वीपकल्प कमांड (पेनिन्सुला कमांड) 2021 सालच्या अखेपर्यंत साकार होण्याची शक्यता असल्याचेही संरक्षणप्रमुख म्हणाले.
 • नौदल कमांडरच्या नेतृत्वाखालील तिन्ही सेवांच्या (ट्राय-सव्‍‌र्हिस) कमांडमध्ये हवाई साधने तसेच त्यांना लष्कराचे पाठबळ राहील आणि हे कमांड हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षाविषयक आव्हानांची संपूर्ण काळजी घेईल. हिंदी महासागराची सुरक्षा एका कमांडरच्या हाती राहील आणि जहाजांच्या हालचालींसह परिचालनविषयक बाबींसाठी त्याला दिल्लीची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही, असेही जनरल रावत यांनी स्पष्ट केले.

मेसी, हॅमिल्टनला लॉरेयो पुरस्कार :

 • ब्रिटनचा फॉम्र्युला-वन ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांनी यंदाच्या वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लॉरेयो पुरस्कारावर संयुक्तपणे नाव कोरले आहे.
 • तर 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच समान मते मिळाल्यामुळे दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • तसेच सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही. या दोघांनी गोल्फपटू टायगर वुड्स, केनियाचा धावपटू इलिड किपचोग, टेनिसपटू राफेल नदाल आणि मोटोजीपी विजेता मार्क मार्केझ  यांच्यावर मात करत हा पुरस्कार पटकावला.
 • तर 2019च्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळवणारी अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स हिने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. गेल्या चार वर्षांतील तिचा हा तिसरा पुरस्कार ठरला.
 • याआधी तिने 2017 आणि 2019मध्ये सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले होते. तिने जमैकाची धावपटू शेली अ‍ॅन-फ्रेसर-प्राइस, टेनिसपटू नाओमी ओसाका, अमेरिकेची अ‍ॅथलीट अ‍ॅलिसन फेलिक्स यांचे आव्हान मोडीत काढले.
 • तर दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाने जर्गेन क्लॉप यांच्या लिव्हरपूल आणि अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघावर मात करत लॉरेओ जागतिक सांघिक पुरस्कारावर मोहोर उमटवली. दक्षिण आफ्रिका रग्बी संघाने 2019 मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार :

 • कुस्तीमधील ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक पंढरीनाथ पठारे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • तसेच याचप्रमाणे युवराज खटके (अ‍ॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे (कुस्ती), नितीन खत्री (तायक्वांदो), जगदीश नानजकर (खो-खो) आािण अनिल पोवार (पॅराअ‍ॅथलेटिक्स) या पाच जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत 2018-19 या वर्षांसाठी 63 जणांना शिवछत्रपती पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली.
 • तर यात 48 खेळाडूंचा (23 पुरुष, 25 महिला) समावेश आहे. येत्या शनिवारी, 22 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.

आशियाई कुस्ती स्पर्धात सुनील कुमारची सोनेरी कामगिरी :

 • सुनील कुमारच्या रूपाने भारताला आशियाई कुस्ती स्पर्धेत ग्रिको-रोमन प्रकारात 27 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळाले. सुनीलने 87 किलो वजनी गटात अंतिम फेरीत किर्गिझिस्तानच्या अझत सॅलिडिनोव्हवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला.
 • सुनीलला अंतिम फेरीत सहज विजय मिळाला असला तरी उपांत्य फेरीत मात्र त्याला झुंज द्यावी लागली.
 • तसेच त्याने उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या अझमत कुस्तूबायेवविरुद्ध 1-8 पिछाडीवरून सलग 11 गुण जिंकत 12-8 अशा फरकाने विजय संपादन केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत सुनील याने अंतिम फेरी गाठत रौप्यपदक मिळवले होते. मात्र यंदा सोनेरी कामगिरी करण्यात त्याला  यश आले.
 • तत्पूर्वी, स्पर्धेतील भारताच्या वाटय़ाला पहिले पदक अर्जुन हलाकुरर्कीच्या रूपाने (55 किलो) मिळाले. कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या लढतीत अर्जुन याने कोरियाच्या डोंघियॉक वॉन याला नमवले.
 • भारतीयांच्या अन्य लढतींमध्ये सचिन राणाचे 63 किलो वजनी गटातील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
 • सचिनचा उझबेकिस्तानच्या इलमुरतकडून 0-8 असा मोठा पराभव झाला. 77 किलो वजनी गटात साजन याचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

बोल्टचा विक्रम मोडणाऱ्या श्रीनिवास गौडाला धक्का, नवीन धावपटूने नोंदवला विक्रमी वेळ :

 • कर्नाटक राज्यात बैलांसोबत शेतामध्ये पळण्याच्या शर्यतीत श्रीनिवास गौडा या तरुणाने 9.55 सेकंदात 100 मी. चं अंतर पार केलं, आणि देशभरात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.
 • तर अनेक प्रसारमाध्यमांनी श्रीनिवासला भारताचा उसेन बोल्ट असंही नाव दिलं. शशी थरुर, आनंद महिंद्रा यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी सोशल मीडियावर श्रीनिवासचं कौतुक करत, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना श्रीनिवासला ऑलिम्पिकसाठी मदत करण्याचं आवाहन केलं.
 • मात्र काही दिवसांतच याच कंबाला शर्यतीत निशांत शेट्टी नावाच्या तरुणाने श्रीनिवासचाही विक्रम मोडत सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे.
 • वेणूर भागात पार पडलेल्या शर्यतीमध्ये निशांत शेट्टीने 9.51 सेकंदात 100 मी. चं अंतर पार केलं. काही दिवसांपूर्वी श्रीनिवासच्या नावे हा विक्रम जमा होता.
 • श्रीनिवासच्या कामगिरीची दखल घेत, केंद्रीय क्रीडा मंत्रि किरेन रिजिजू यांनी त्याच्यासाठी ‘साई’ (Sports Authority of India) मध्ये ट्रायलची सोय केली होती.

सचिन तेंडुलकरने जिंकला क्रीडा विश्वातला ऑस्कर :

 • 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीनं कुलसेखराच्या गोलंदाजीवर षटकार लगावत भारताला जगतजेता बनवलं. भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचं सचिन तेंडुलकरचं स्वप्न साकार झालं होतं.
 • 2 एप्रिल 2011 रोजी विश्वचषक विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. यादरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. त्यावेळी टिपलेल्या क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
 • तसेच त्या क्षणाला ‘ कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ शीर्षक देण्यात आलं आहे.
 • क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे.
 • 2019-2020 या 20 वर्षांमध्ये क्रीडा विश्वाताला हा सर्वात भावूक आणि प्रेरणा देणारा क्षण होता. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला.

केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धात हम्पीला विजेतेपद :

 • जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे डिसेंबरमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कोनेरू हम्पीने केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.
 • तसेच याबरोबरच दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद हम्पीला तिच्या नावे करता आले. हम्पीला त्यामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवता आला. कारण तिच्या खात्यात पाच गुणांची भर पडली.
 • तर स्पर्धेत अखेरच्या म्हणजेच नवव्या फेरीत हम्पीने भारताच्या द्रोणावल्ली हरिकाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. परिणामी, सहा गुणांसह हम्पीने केर्न्‍स चषकावर नाव कोरले.
 • याच स्पर्धेत विजेतेपदाची आणखी एक दावेदार विश्वविजेती वेंजून जू हिला 5.5. गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. वेंजून जू हिने रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकविरुद्ध विजय मिळवला.
 • कोस्टेनियूकला स्पर्धेत चौथे स्थान मिळाले. भारताच्या हरिकाला 4.5 गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

व्यवसायासाठी सरकार देणार 3.75 लाख रुपये :

 • मोदी सरकारनं ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं मृदा आरोग्य कार्ड योजना(Soil Health Card Scheme) तयार केली आहे.
 • तर या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील तरुण शेतकरी ज्यांचं वय 18 ते 40 वर्षं आहे, ते ग्रामीण स्तरावर मृदा परीक्षण प्रयोगशाळे(Soil Test Laboratory)ची स्थापना करू शकतात.
 • प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च येतो, ज्यातील 75 टक्के म्हणजे 3.75 लाख रुपये मोदी सरकार देणार आहे.
 • तसेच या योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता गट, कृष्णा सहकारी समिती, कृषक गट किंवा कृषक उत्पादक संघटनेनं या प्रयोगशाळेची स्थापना केल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारद्वारे मातीचा नमुना घेणे, परीक्षण करणं आणि सॉइल हेल्थ कार्ड उपलब्ध करून  देण्यासाठी 300 प्रतिनमुना प्रदान करण्यात येणार आहे.
 • लॅब बनवण्यासाठी सामान्य तरुण किंवा इतर संघटनांचे उप-संचालक (कृषी), संयुक्त संचालक (कृषी) किंवा त्यांच्या कार्यालयाला प्रस्ताव देता येणार आहे.
 • मातीच्या नमुन्याच्या प्रयोगशाळेची दोन पद्धतीनं सुरुवात करता येते. प्रयोगशाळा एक दुकान भाड्यानं घेऊन त्यात सुरू करता येईल, दुसऱ्या पद्धतीत प्रयोगशाळा फिरती असते, की ती कुठेही घेऊन जाता येणार आहे, त्याला MOBILE SOIL TESTING VAN म्हटले जाते.

पाकिस्तानचा FATF च्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम

 • भारताविरोधातदहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानाला आज जबरदस्त धक्का बसला आहे. फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानचा ग्ले लिस्टमधील समावेश कायम ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
 • FATF च्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांचा मिळणारी आर्थिक रसद तोडल्याचे पुरावे FATF ला दिले होते.
 • मात्र या पुराव्यांबाबत या संस्थेला संशय आहे. मात्र मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड असलेल्या हाफिझ सईद याला देण्यात आलेली 11 वर्षांची शिक्षा हीच पाकिस्तानसाठी एकमेव आशेचा किरण आहे.
 • तसेच मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा यापुढेही FATFच्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम राहणार आहे. ही बाब पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
 • कारण जर पाकिस्तानने दिलेल्या पुराव्यांमधून FATF चे समाधान झाले नाही तर पाकिस्तानचा समावेश ब्लॅकलिस्टमध्ये केला जाऊ शकतो. दरम्यान, पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यासाठी तुर्की आणि मलेशियाने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. भयंकर संकटामुळे पाकिस्तानात आणीबाणी लागू; भारताकडे मागितला मदतीचा हात

दिनविशेष:

 • 19 फेब्रुवारी हा दिवस ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती‘ म्हणून साजरा केला जातो.
 • सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निकोलस कोपर्निकस‘ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1473 मध्ये झाला होता.
 • 19 फेब्रुवारी 1630 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज‘ यांचा जन्म झाला.
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 रोजी झाला होता.
 • सन 2003 यावर्षी तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.