19 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

19 December 2018 Current Affairs In Marathi

19 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2018)

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन:

 • मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन झाले आहे. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे सकाळी निधन झाले. त्यांनी 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिगदर्शन केले होते.
 • नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. यशवंत भालकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षही होते. Yashvant Bhalkar
 • जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते.
 • नुकतंच पार पडलेल्या लोकांकिकामध्ये ते सहभागी झाले होते. लोकांकिका विभागीय अंतिम फेरीत विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत संगीत नाट्य अभ्यासक श्रीकृष्ण लाटकरदेखील होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 डिसेंबर 2018)

‘व्हिलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर:

 • ऑस्करसाठी भारताचे अधिकृत नामांकन असलेलाव्हिलेज रॉकस्टार्स‘ हा चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असून, 91व्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याचे नामांकन उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात झाले होते. आता हा चित्रपट बाद झाला असून 87 पैकी केवळ नऊ चित्रपट पुढील फेरीत पोहोचले आहेत.
 • व्हिलेज रॉकस्टार्स‘ चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा दास यांनी केले असून, तो आसामी चित्रपट आहे. खेडय़ातील मुलांच्या चमूला रॉकस्टार बनण्याचे स्वप्न असते असे त्याचे कथानक आहे. दास यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे, की ऑस्करचे स्वप्न भंगले असले तरी या अविश्वसनीय प्रवासासाठी मी सर्वाची ऋणी आहे. प्रत्येक पावलावर तुम्ही माझ्यासमवेत होतात. ऑस्करचे स्वप्न भंगले असले तरी स्वप्ने पाहण्यावरची आमची श्रद्धा कायम राहील.
 • तसेच आतापर्यंत परदेशी चित्रपट गटात आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान‘ चित्रपट 2001 मध्ये अखेरच्या पाच चित्रपटांत होता. मदर इंडिया (1958), सलाम बॉम्बे (1989) हे दोन भारतीय चित्रपट पहिल्या
  पाचात होते.
 • ऑस्कर विजेते अल्फान्सो क्युरॉ यांचा ‘रोमा हा चित्रपट अखेरच्या आठात आहे. त्याला पावेल पावलिकोवस्की यांच्या ‘कोल्ड वॉर’ चित्रपटाचे कडवे आव्हान असणार आहे. त्यांना 2013 मध्ये ‘इडा’ या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाले होते.
 • जपानचा ‘शॉप लिफ्टर्स’ ही शर्यतीत आहे. बर्ड्स ऑफ पॅसेज (कोलंबिया), दी गिल्टी (डेन्मार्क), नेव्हर लुक अवे (जर्मनी), अयाका (कझाकिस्तान), बर्निग (दक्षिण कोरिया) हे चित्रपट स्पर्धेत आहेत. 24 फेब्रुवारीला 91वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉसएंजल्स येथील डॉल्बी थिएटर्स येथे होणार आहे.

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल:

 • मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता केंद्राने डिसेंबर 2014 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.
 • मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. सुकन्या समृद्धी योजना
 • तर केंद्र सरकारने या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारने या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.5 टक्के केले आहे.
 • 1 ऑक्टोबरपासून नवे व्याजदर लागू झाले असून, आपल्याला या व्याजदरामुळे मोठा फायदा मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच सराकरने या योजनेत बदल केले आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आपण फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकतो. ज्यासाठी पहिल्यांदा 1000 रुपये मोजावे लागत होते.
 • तसेच आपल्यालाही जर मुलगी असेल तर केंद्राची ही योजना भरपूर फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे सदर खाते भारतात कुठेही एका डाकघरातून दुसऱ्या डाकघरात स्थानांतरित करण्यात येते. या योजनेत पालकाला समाविष्ट होण्यासाठी कुठलीही अट ठेवण्यात आली नाही.

प्रत्येक गरिबाला मोफत एलपीजी कनेक्शन:

 • 2019 लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
 • तसेच प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2016 मध्ये या योजनेची सुरूवात झाली होती.
 • आर्थिक बाबींबद्दलच्या कॅबिनेट समितीने उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. यामुळे आतापर्यंत ज्या गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळाले नव्हते किंवा जे याच्यासाठी पात्र नव्हते अशा सगळ्यांना याचा लाभ होईल असे प्रधान म्हणाले.
 • ‘आतापर्यंत 2011 च्या सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणनेनुसार एलपीजी कनेक्शन दिले जात होते. त्यानंतर अनुसुचित जाती, मागासलेला समाज आणि पंतप्रधान आवास योजना आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. पण आता यामध्ये सर्व गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता 100 टक्के कुटुंबांपर्यंत एलपीजी कनेक्शन पोहोचेल’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिनविशेष:

 • 19 डिसेंबर हा दिवस ‘गोआ मुक्ती दिन‘ आहे.
 • भारताच्या 12व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपतीप्रतिभा पाटील‘ यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 मध्ये झाला.
 • सन 1961 मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
 • व्ही.एन. खरे यांनी सन 2002 मध्ये भारताचे 33वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.