18 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
18 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 मार्च 2020)
भारतीय लष्कराने घेतला हा मोठा निर्णय :
- करोना व्हायरसची दहशत वाढते आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्णय घेतले जात आहेत. भारतीय लष्करही त्यात मागे नाही.
- भारतीय लष्करानेही विविध 90 प्रकारच्या कोर्सेसना स्थगिती दिली आहे. लष्कराशी संबंधित प्रशिक्षण देणारे हे कोर्सेस आहेत. ज्यांना स्थगिती देण्यात आली आहे. लष्कराने हा मोठा निर्णय घेतला आहे.
- तर या कोर्समध्ये जास्तीत जास्त जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र करोनाची दहशत लक्षात घेऊन आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे 90 प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस पुढे ढकलण्यात आले आहेत.
- तर 16 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत 90 कोर्सेस घेतले जाणार होते. या कोर्सेसमध्ये 6 हजार लोकांचा समावेश होता. या सहा हजार लोकांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून हे कोर्सेस पुढे ढकलण्यात आले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
नितीन वाकणकर डीएव्हीपीचे नवे महासंचालक :
- सीबीआयच्या प्रवक्तेपदावर छाप उमटवणारे मराठी अधिकारी नितीन वाकणकर यांची ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशनच्या (डीएव्हीपी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयच्या प्रतिमेचा नकारात्मक प्रसार रोखण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.
- तर सीबीआय संचालक आर. के. शुक्ला यांच्याशी सल्लामसलत करून वाकणकर यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सीबीआयची प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न केले.
- भारतीय माहिती सेवेत असताना वाकणकर यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचेही माध्यम सचिव होते. दिवंगत माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयातही त्यांनी माहिती व प्रचार विभागाची धुरा सांभाळली होती.
नौदलातील ‘पर्मनंट कमिशन’चे दरवाजेही महिलांना खुले :
- लष्कराच्या पाठोपाठ नौदल या देशाच्या दुसऱ्या सशस्त्र सैन्य दलातील ‘पर्मनंट कमिशन’चे दरवाजेही सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुले केले.
- तर महिलांची नौदलात भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकार लिंगभेद करून महिलांना ‘पर्मनंट कमिशन’च्या हक्कापासून वंचित करू शकत नाही, असे न्यायालयाने जाहीर केले, अशा प्रकारे एका महिन्यात दिलेल्या दोन निकालांनी न्यायालयाने लष्कर व नौदल या दोन सैन्यदलांमध्ये महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने देशाचे संरक्षण करण्यास समर्थ ठरविले आहे.
- तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या सन 2015 मधील निकालाविरुद्ध भारत सरकारने केलेले अपील फेटाळताना न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला.
दिनविशेष:
- शहाजी राजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता.
- 18 मार्च 1867 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म झाला होता.
- स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म 18 मार्च 1881 रोजी झाला.
- सन 1922 मध्ये महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरूंगवास झाला.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन सन 1944 मध्ये भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा