18 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 July 2019 Current Affairs In Marathi

18 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 जुलै 2019)

चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड :

  • सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे.
  • सरकार लवकरच ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
  • इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहे, ही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती.
  • तर त्यामुळे सरकारी कागदपत्रावर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबर टाकाताना सावधानता बाळगा. चुकीचा आधार नंबर टाकल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
  • ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’च्या कलम 272 नुसार हा बदल केला जाणार आहे. हा नवीन नियम एक सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जुलै 2019)

हिमाची आणखी एक सुवर्ण कामगिरी :

  • भारतीय वेगवान धावपटू हिमा दासची दमदार कामगिरी सुरूच आहे. सलग 15 दिवसांच्या आत हिमाने धावण्याच्या
  • विविध स्पर्धांमध्ये चौथे सुवर्णपदक जिंकत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
  • झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या टॅबर ऍथलेटिक्स मीटवर हिमा दास ने हा पराक्रम केला आहे.
  • तसेच पुरुषांच्या 400 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने आपले दुसरे सुवर्ण पदक मिळवले आहे.
  • हिमा ने केवळ 23.25 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याआधी 19 वर्षांच्या हिमाने 2,6 आणि 14 जुलै रोजीही तीन सुवर्णपदक जिंकले होते.

चांद्रयान-2चे प्रक्षेपण 21 किंवा 22 जुलै रोजी :

  • चांद्रयान-2 या अवकाशयानाचे 21 जुलै रोजी दुपारी किंवा 22 जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे.
  • जीएसएलव्ही मार्क 3 या प्रक्षेपकाच्या मदतीने गेल्या सोमवारी पहाटे झेपावणाऱ्या चांद्रयान2 चे उड्डाण आयत्या वेळी उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले होते.
  • श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर, ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल.
  • चांद्रयान-2चे या आधी प्रक्षेपण करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावेळी निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी इस्रोचे अभियंते व शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत.

दिनविशेष :

  • 18 जुलै हा ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 मध्ये झाला.
  • सन 1968 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना झाली.
  • अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झाला.
  • उद्योगपती गोदरेज यांना सन 1996 मध्ये जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जुलै 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.