18 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

एके-203
एके-203

18 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 जानेवारी 2023)

लष्करासाठी अत्याधुनिक एके-203 रायफलच्या उत्पादनाला अमेठीमध्ये सुरुवात:

 • भारताच्या लष्कराला आता अत्याधुनिक रायफली मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • उत्तर प्रदेश इथल्या अमेठी इथे रशियाचे तंत्रज्ञान असलेल्या एके-203 (AK-203) या जगातील अत्याधुनिक स्वयंचलित रायफलींच्या उत्पादनाला अखेर सुरुवात झाली आहे.
 • लष्कराकडे सध्या INSAS (Indian Small Arms System) प्रकारातील रायफली असून आता त्याची जागा आधुनिक एके-203 घेणार आहे.
 • एके-203 रायफल ही सध्याच्या काळातील रायफल प्रकारातील सर्वात अत्याधुनिक रायफल म्हणून ओळखली जाते.
 • रायफलच्या मॅगझिनमझध्ये 30 ते 50 गोळ्या सामावण्याची क्षमता असली तरी एका मिनीटात 700 एवढ्या वेगाने गोळ्या डागण्याची-झाडण्याची या रायफलची क्षमता आहे.
 • एवढंच नाही जास्ती जास्त 800 मीटर अंतरापर्यंतच अचूक मारा करण्याची क्षमता या रायफलमध्ये आहे.

जे. पी. नड्डा यांना भाजप अध्यक्षपदी मुदतवाढ:

 • भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत (जूनपर्यंत) पदावर कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
 • नवी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
 • केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नड्डा यांना मुदतवाढ देण्याबाबतचा ठराव मांडताच तो एकमताने मंजूर करण्यात आला.

तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना:

 • शालेय शिक्षण प्रक्रियेत तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे सहजतेने एकत्रीकरण करण्यासाठी ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (एनसीईआरटी) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
 • तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी लिंगभाव विरहित गणवेश, तृतीयपंथी समावेश अभ्यासक्रम, सुरक्षित स्वच्छतागृह या विविध सुविधांसह लिंगआधारित हिंसा रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या शिफारशी एनसीईआरटीने आपल्या अहवालात केल्या आहेत.
 • ‘एनसीईआरटी’च्या लिंग अभ्यास विभागाच्या प्रमुख ज्योत्स्ना तिवारी यांच्या नेतृत्वाखालील 16 सदस्यीय समितीने यासंबंधी मसुदा तयार केला आहे.

दिनविशेष:

 • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये झाला होता.
 • चंदन तस्कर वीरप्पन याचा जन्म 18 जानेवारी 1952 रोजी झाला होता.
 • सन 1998 मध्ये मदनमोहन पूंछी यांनी भारताचे 28वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
 • नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना सन 1999 मध्ये भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर झाला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.