18 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

तेजस फायटर
तेजस फायटर

18 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 फेब्रुवरी 2020)

S-400 सिस्टिम वेळेत देण्याचा रशियाचा शब्द:

 • संरक्षण क्षेत्रात रशियाने भारताला नेहमीच मोलाची मदत केली आहे. युद्धासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याच्या पुरवठयाबरोबर उत्पादनाची टेक्नोलॉजी भारताला दिली आहे.
 • तसेच लवकरच दोन्ही देशांमधील संरक्षण व्यवहार 16 अब्ज डॉलरच्या पुढे जाणार आहे.
 • तर एस-400 एअर डिफेन्स सिस्टिमसह, कालाश्नीकोव्ह रायफल्स, कामोव्ह हेलिकॉप्टर्स या करारांची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.
 • अलीकडेच लखनऊनमधील डिफेन्स एक्सपोमध्ये भारत-रशियामध्ये 14 सामंजस्य करार झाले. कामोव्ह केए-226 हेलिकॉप्टर्ससाठी लागणाऱ्या सुट्टया भागांच्या निर्मितीसाठी रशियन हेलिकॉप्टर्स बरोबर सामंजस्य करार झाला आहे.
 • कामोव्ह केए-226 ही 200 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची भारताची योजना आहे. भारताला 2025 पर्यंत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टिम मिळणार आहे.
 • कलाश्निकोव्ह एके-203 मशीन गन आणि केए-226 टी बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सची संयुक्त भागदारी प्रकल्पातंर्गत निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी करणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.
 • S-400 मिसाइल सिस्टिम खरेदी व्यवहारात भारताने रशियाला 6 हजार कोटींचा पहिला हप्ता दिला आहे. एस-400० चे वैशिष्टय म्हणजे ही सिस्टिम शत्रूची फायटर विमाने, ड्रोन, आणि मिसाइल्स शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे.
 • भारताने ऑक्टोंबर 2018 मध्ये रशियाबरोबर पाच एस-400 सिस्टिम खरेदीचा करार केला आहे. एकूण 40 हजार कोटीचा हा व्यवहार आहे.
 • तर एस-400 ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे.
 • त्याला नाटो संघटनेने एसए-21 ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे 30 किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण 600 किमी अंतरावरील 100 लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते.
 • त्यासाठी एस-400 प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘9 एम 96 ई’ हे क्षेपणास्त्र 40 किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘9 एम 96 ई 2’ हे क्षेपणास्त्र 120 किमीवर मारा करू शकते. ‘48 एन 6’ हे क्षेपणास्त्र 250 किमीवर, तर ‘40 एन 6’ हे क्षेपणास्त्र 400 किमीवर मारा करू शकते.

आता रेल्वे स्थानकांवर नाही मिळणार Google ची फ्री WiFi सेवा

 • Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा आता मिळणार नाही. ‘पाच वर्षांपूर्वी ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ऑनलाईन जाणे खूप सोपे आणि स्वस्त झाले आहे’, असे म्हणत गुगलने मोफत वायफाय सेवा पुरवणारा ‘Google Station’हा प्रकल्प भारतासह अन्य देशांमध्येही बंद करत असल्याची माहिती दिली.
 • भारताशिवाय ही सेवा नायजेरिया, थायलंड, फिलिपाइन्स, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिका येथेही पुरवली जात होती, पण आता तेथील सेवाही बंद केली जाईल.
 • देशात आपली ऑनलाइन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता ‘स्टेशन’ सेवेची आवश्यकता उरली नसल्याचे कारण गुगलने दिले आहे.
 • ‘स्टेशन’ सेवेने देशातील 400 स्थानके 2020 च्या मध्यापर्यंत जोडण्याचे ध्येय गुगलने बाळगले होते. परंतु, हा आकडा 2018मध्येच पार केल्याचे गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी म्हटले आहे.

लष्करात महिलाही नेतृत्वपदी :

 • लष्करातील लिंगाधारित भेदभाव संपुष्टात आणण्याचे निर्देश देतानाच सर्वोच्च न्यायालयाने तळप्रमुखसारख्या नेतृत्वपदी महिलांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला.
 • शारीरिक मर्यादा आणि सामाजिक रुढींमुळे महिलांना लष्करात नेतृत्वपदे दिली जात नसल्याचा केंद्राचा दावा धक्कादायक असून, महिला अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, असे निर्देश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले.
 • तर दिल्ली उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली नसताना त्याचे पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन यूपीए आणि विद्यमान एनडीए सरकारवर ताशेरे ओढले.
 • लष्करामध्ये लिंगाधारित भेदभाव संपवण्यासाठी सरकारने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे.
 • महिलांना तळप्रमुखसारखी नेतृत्वाची पदे देण्यात कुठलीही आडकाठी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. महिला अधिकाऱ्यांना स्थायी नियुक्ती आणि नेतृत्वपद न देणे हे समानतेच्या तत्त्वाविरोधात असल्याचे न्या. चंद्रचूड, न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
 • तसेच सध्या लष्करात एकूण 1 हजार 653 महिला अधिकारी असून, हे प्रमाण लष्करी अधिकाऱ्यांच्या एकूण संख्येच्या 3.89 टक्के आहे.

IAF HAL कडून विकत घेणार 83 ‘तेजस’ फायटर विमाने :

 • इंडियन एअर फोर्स आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) देशांतर्गत संरक्षण क्षेत्रातील मोठा करार झाला आहे.
 • एअर फोर्स एचएएलकडून सपोर्ट पॅकेजसह 83 सिंगल सीटर तेजस फायटर विमाने विकत घेणार आहे.
 • तर आधी 83 फायटर विमानांसाठी 56,500 कोटी रुपये मोजावे लागणार होते. पण आता हा संपूर्ण व्यवहार 39 हजार कोटी रुपयांमध्ये अंतिम झाला आहे.
 • वर्षभरातील चर्चेच्या वेगवेगळया फेऱ्यानंतर ही किंमत 17 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. 83 तेजस मार्क-1ए विमानांच्या निर्मितीसाठी एचएएलने सुरुवातीला जी किंमत सांगितली होती, त्याने संरक्षण मंत्रालय आणि इंडियन एअर फोर्सला धक्का बसला होता.
 • तसेच आता 39 हजार कोटी रुपयांना अंतिम व्यवहार निश्चित झाला असून, खरेदी संदर्भातील फाईल अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला पाठवण्यात येणार आहे.
 • नव्या 83 तेजस मार्क-1 ए मध्ये एकूण 43 सुधारणा करण्यात आल्या आहेत. AESA हे अत्याधुनिक रडार, हवेतच इंधन भरण्याची क्षमता, दृष्टीपलीकडे हल्ला करु शकणारी बीव्हीआर मिसाइल सिस्टिम आणि शत्रू्च्या विमानांची रडार जॅम करणारी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या टेक्नोलॉजीने नवीन तेजस मार्क-1 ए विमाने सुसज्ज असतील. तेजस मार्क-1 ए ची उड्डाण चाचणी 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दिनविशेष:

 • पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.
 • स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला होता.
 • क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 मध्ये झाला.
 • 1979 या वर्षी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
 • सन 1998 मध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.