18 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

18 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 डिसेंबर 2020)

‘इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण :

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताचा 42 वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला.
  • तर हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे. कोविड-19च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे.
  • श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटने अवकाशात झेप घेतली.
  • तसेच हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
  • तर सीएमएस-01, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे 52 वे अभियान आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2020)

मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण :

  • भारतातील दरडोई उत्पन्न, जीवनशैलीचा दर्जा, आरोग्य आणि शैक्षणिक स्थिती यांच्या घसरलेल्या आलेखामुळे मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण झाली आहे.
  • तर 189 देशांच्या यादीत भारत 131 व्या स्थानी असल्याचे संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (यूएनडीपी)ने जाहीर केलेल्या अहवालत स्पष्ट झाले आहे.
  • देशाची आरोग्य, शौक्षणिक स्थिती तसेच राहणीमानाचा दर्जा यावर मानवी विकास निर्देशांक (एचडीआय) मोजला जातो.
  • भारताचे एचडीआय मूल्य 0.645 इतके नोंदवले गेले. त्यामुळे भारताची गणना मध्यम मानवी विकास वर्गवारीत झाली आहे.
  • मध्यम मानवी विकास वर्गवारीसह मानवी विकास निर्देशांकात भूतान 129, बांगलादेश 133, नोपाळ 142 आणि पाकिस्तान 154 स्थानावर आहे.

संरक्षण उपकरणांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी :

  • संरक्षण मंत्रालयानं तिन्ही सैन्य दलांसाठी 28,000 कोटी रुपयांच्या शस्त्रे आणि सैन्य उपकरणांच्या खरेदीला गुरुवारी मान्यता दिली. विशेष म्हणजे स्थानिक क्षेत्रातूनच ही खरेदी केली जाणार आहे.
  • पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर या खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
  • तसेच अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व शस्त्रे आणि सैन्य उपकरणांची खरेदी ही स्थानिक कंपन्यांकडून केली जाणार आहे. यासंदर्भातील एकूण सात प्रस्ताव डीएसीने मंजूर केले आहेत.
  • तर मंजूर झालेल्या प्रस्तावांमध्ये भारतीय वायुसेनेसाठी डीआरडीओने डिझाइन आणि विकसित केलेल्या उपकरणाचा समावेश आहे.
  • यामध्ये हवेतून लवकर इशारा देणारी व नियंत्रण प्रणाली आहे. तर भारतीय नौदलासाठी नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोलिंग जहाजांची आणि भारतीय सैन्यासाठी मॉड्युलर पुलांच्या खरेदीचा समावेश आहे.

अमित पागनीस मुंबईचा प्रशिक्षक :

  • माजी क्रिकेटपटू अमित पागनीसकडे 2020-21 क्रिकेट हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
  • तर 42 वर्षीय पागनीसने मुंबई, रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 95 सामन्यांत 5851 धावा केल्या आहेत.

दिनविशेष:

  • 18 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर ‘भिखारी ठाकूर‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
  • एफ.एम. रेडिओचे संशोधक ‘ई.एच. आर्मस्ट्रॉंग‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1890 मध्ये झाला होता.
  • सव्यसाची मुखर्जी यांनी सन 1989 मध्ये भारताचे 20वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
  • सन 2016 मध्ये भारतीय ज्युनियर हॉकी टिमने बेल्झियमला हरवून ज्युनियर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.