18 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
18 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2022)
रेल्वेने ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त सामान नेल्यास मोजावे लागणार ज्यादा पैसे :
- भारतीय रेल्वेने प्रवासादरम्यान नेता येणाऱ्या सामानासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत.
- नव्या नियमांनुसार आता प्रवाशांना रेल्वेने ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त सामाना सोबत न्यायचे असल्यास त्यांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे.
- रेल्वेने प्रत्येक डब्यानुसार सामानाची मर्यादा निश्चित केली आहे.
- यानुसार 40 ते 70 किलो वजनाचे सामान ट्रेनच्या डब्यात ठेवता येणार आहे.
- तर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांना 40 किलो पर्यंतचे सामान सोबत नेता येणार आहे.
- तसेच एसी डब्यात प्रवास करणाऱ्यांना 50 ते 70 किलो वजनाचे सामान नेण्याची परवानगी आहे.
Must Read (नक्की वाचा):
आयसीसीने जाहीर केले पुरुष क्रिकेटचे वेळापत्रक :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- आयसीसीने पुरुष क्रिकेटच्या पुढील टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
- 2022 ते 2027 या कालावधीत 12 देशांदरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये 777 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील.
- यामध्ये 173 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 323 टी-20 सामने होणार आहेत. सध्याच्या टप्प्यातील सामन्यांपेक्षा पुढील टप्प्यातील सामन्यांची संख्या जास्त आहे.
- द्विपक्षीय मालिकांव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमध्ये मोठ्या स्पर्धांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
- पुढील वर्षी भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषकापासून याची सुरुवात होईल.
भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश :
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) बंदी उठवण्याबाबत आणि कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत केंद्र सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
- प्रशासकीय कारभारात होत असलेल्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने मंगळवारी भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे.
- या कारवाईची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ‘एआयएफएफ’ संदर्भातील याचिकेची तातडीने सुनावणी करण्यात आली.
- तर या सुनावणीदरम्यान सरकारनेच कुमारी विश्वचषक स्पर्धा भारतात घेण्यासंदर्भात ‘फिफा’शी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
- त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.
दिनविशेष:
- मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला.
- सन 1824 मध्ये जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे सन 1942 मध्ये तिरंगा फडकावला.
- राजदूत, मुत्सद्दी राजकारणी ‘विजयालक्ष्मी पंडीत‘ यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 मध्ये झाला.