18 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2020)
सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती :
- सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- 2018 साली सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. मंगळवारी सकाळी राकेश अस्थाना आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत.
- राकेश अस्थाना 1984 बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे.
Must Read (नक्की वाचा):
सबरीना सिंह अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रेस सचिव :
- डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी सबरीना सिंह यांची प्रचार अभियानासाठी प्रेस सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
- सबरीना सिंह या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. सबरीना सिंह यांनी यापूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन उमेदवाराच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी संभाळली आहे.
- अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांची निवड केली आहे.
- लॉस एजिल्समध्ये राहणाऱ्या सबरीना सिंह याआधी डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या प्रवक्त्या होत्या. ते इंडिया लीग या नॉन प्रॉफिट संघटनेशी संबंधित होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय-अमेरिकन समुदायाच्या हितासाठी ही संघटना काम करते.
पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन :
- पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन. न्यू जर्सी येथे त्यांचं निधन झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते.
- भारत सरकारने 2000 मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते.
- पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला होता. पंडित जसराज हे गेल्या 80 वर्षांपासून जास्त काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते.
- संगीत क्षेत्रातल्या अनेक प्रमुख पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
दिनविशेष:
- मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला.
- सन 1824 मध्ये जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे सन 1942 मध्ये तिरंगा फडकावला.
- राजदूत, मुत्सद्दी राजकारणी ‘विजयालक्ष्मी पंडीत‘ यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 मध्ये झाला.