17 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

रॉबिन उथप्पा
रॉबिन उथप्पा

17 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2022)

जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत गौतम अदाणी दुसऱ्या स्थानी :

 • अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत LVMH Moet Hennessy – Louis Vuitton चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे.
 • फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत व्यक्ती आहेत.
 • फोर्ब्सच्या यादीत सध्या स्पेसएक्स आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) इलॉन मस्क हे अग्रस्थानी आहेत.
 • त्याच्यापाठोपाठ अदानी, अरनॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा क्रमांक लागतो.
 • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आठव्या स्थानावर आहेत.

आशिया चषकात विराटची जोरदार कामगिरी, टी-20 क्रमवारीत 14 व्या स्थानी झेप :

 • आशिया चषकात कोहलीने ‘विराट’ कामगिरीच्या जोरावर 14 स्थानांची उंच उडी घेत सर्वोतम 20 मध्ये पोहचला.
 • फगानिस्तान विरुद्ध त्याने टी 20 मधील पहिले शतक झळकवत आपण फॉर्म मध्ये आलो आहोत हे दाखवून दिले.
 • तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज राहिला.
 • विराट आयसीसी फलंदाजांच्या टी 20 क्रमवारीत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. आशिया चषकापूर्वी तो 33 व्या स्थानावर होता.
 • तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान अव्वलस्थानी कायम आहे. तो आशिया चषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही राहिला होता.

ग्रीन कोर्ट टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं केली निवृत्तीची घोषणा :

 • आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 20 ग्रँड स्लॅम खिताब नावावर करणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केली आहे.
 • आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्र पोस्ट करून त्यातून त्यानं आपल्या चाहत्यांना निवृत्तीची बातमी दिली आहे.
 • पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कप स्पर्धेनंतर आपण निवृत्त होत असल्याचं रॉडर फेडररनं या पत्रामध्ये नमूद केलं आहे.

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धात विनेशला कांस्य :

 • भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या विनेश फोगटने जागतिक स्पर्धेत बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली.
 • यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले.
 • पात्रता फेरीतील पराभवानंतरही मिळालेली संधी विनेश फोगटने अचूक साधली.
 • याशिवाय निशा दहियाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

रॉबिन उथप्पाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा :

 • भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक खेळाडू रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
 • त्याने ट्वीट करत एक निवदेन जारी केले आहे.
 • उथप्पाने 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
 • तसेच 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दिनविशेष :

 • 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन म्हणून पाळला जातो.
 • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मध्ये झाला.
 • महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म 17 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
 • सन 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.