17 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

फेसबुक व्हाट्सअ‍ॅप भाजपा-आरएसएसच्या ताब्यात:
फेसबुक व्हाट्सअ‍ॅप भाजपा-आरएसएसच्या ताब्यात:

17 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2020)

भारतीय तटरक्षक दलाचे 10 सदस्यांचे पथकही मॉरिशसला पाठवले:

 • मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व तटवर्ती क्षेत्रात झालेली तेलगळती आटोक्यात आणण्यासाठी भारताने 30 टन तांत्रिक उपकरणे आणि साहित्य भारतीय हवाई दलाच्या विमानाने मॉरिशसला पाठविले आहे.
 • भारतीय तटरक्षक दलाचे 10 सदस्यांचे एक पथकही मॉरिशसला पाठविण्यात आले आहे, हे पथक तेलगळती आटोक्यात आणण्याच्या कामात निष्णात आहे, हे पथक मॉरिशसला तांत्रिक आणि तेलगळती आटोक्यात आणण्याच्या कामात सहकार्य करणार आहे.
 • असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर जपानचे एक जहाज खडकावर
 • आदळले आणि त्यामधून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनक्षम असलेल्या क्षेत्रात हजारो टन तेलगळती होत आहे.
 • एमव्ही वाकाशिओ या जहाजाचे तुकडे झाल्याचे शनिवारी मॉरिशसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2020)

फेसबुक व्हाट्सअ‍ॅप भाजपा-आरएसएसच्या ताब्यात:

 • प्रसिद्ध द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या भारतातील धोरणांबाबत महत्त्वाचा वृत्तांत प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये फेसबुक सत्ताधारी भाजपाला अनुकूल भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 • वॉल स्ट्रीट जर्नलच्या हा अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी भाजपा व आरएसएसवर निशाणा साधला आहे.
 • “भारतात फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप भाजपा व आरएसएसच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे.
 • मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे. शेवटी अमेरिकन माध्यमाने फेसबुकविषयीचं सत्य उघड केलं आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी भाजपा व आरएसएसवर टीका केली आहे.

देशातील 50 हजारांवर कोरोनाबळी :

 • देशातील करोनाबळींचा आकडा 50 हजारांवर पोहोचला आहे. त्यातील 20 हजार म्हणजे 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.
 • देशात गेल्या 24 तासांत करोनाच्या रुग्णसंख्येत 63,490ची भर पडली. याच कालावधीत 944 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण करोनाबळींची संख्या 49,980 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी दिली.
 • देशभरात करोना रुग्णांची एकूण संख्या 25 लाख 89 हजार 682 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 53 हजार 322 रुग्ण बरे झाले.
 • एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या 18 लाख 62 हजार 258 झाली असून, 6 लाख 77 हजार 444 रुग्ण उपचाराधीन आहेत.
 • रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता 72 टक्क्यांवर गेले आहे. देशभरात सुमारे 3 कोटी नमुना चाचण्या झाल्या असून, गेल्या २४ तासांमध्ये 7.46 लाख चाचण्या करण्यात आल्या.

5 कोटी नवे रोजगार निर्माण- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी:

 • अर्थव्यस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारनंही प्रयत्न सुरू केले आहेत. “आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे.
 • तसंच येत्या काळात या क्षेत्रात 5 कोटी नवे रोजगार निर्माण होती अशी अशा आहे,” असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. स्वावलंबन ई-समिट 2020’ मध्ये गडकरी बोलत होते.
 • आतापर्यंत या क्षेत्रात आम्ही 11 कोटी रोजगार निर्माण केले,” अशी माहिती गडकरी यांनी दिली.
 • एमएसएमई क्षेत्राचं उत्पन्न 30 टक्क्यांवरून 50 टक्के करू आणि निर्यातही 48 टक्क्यांवरून वाढवून 60 टक्के करत 5 कोटी नवे रोजगारही निर्माण करू,” असंही ते म्हणाले.

50 कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार:

 • जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे.
 • गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
 • पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात 50 कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 • यापूर्वी या लसीची 76 स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

धोनी आणि रैना या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली:

 • महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
 • 15 ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यानंतर धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं.
 • यापाठोपाठ धोनीचा साथीदार सुरेश रैनानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीला शुभेच्छा देत मी देखील तुझ्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे असं म्हणत निवृत्ती स्विकारली.

दिनविशेष:

 • सन 1666 मध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
 • श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म 17 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
 • 17 ऑगस्ट 1909 हा दिवस क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांचे स्मृतीदिन आहे.
 • ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1916 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.