Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

16 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन:
माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन

16 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2020)

 अवनी दोशी बुकर पुरस्काराच्या लघुयादीत:

  • यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश आहे.
  • यंदा लघुयादीतील सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत.
  • पुरस्काराच्या लघुयादीत दोनदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मँटेल यांना स्थान मिळाले नाही.
  • अवनी दोशी या अमेरिकेत जन्मल्या असून सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची ‘बर्न्ट शुगर’ ही कादंबरी पुण्यात राहणाऱ्या आई आणि मुलीमधील संघर्षपूर्ण नातेसंबंधांची गोष्ट सांगते.
  • दोशी यांच्यासह डायनी कुक, ब्रॅण्डन टेलर, स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले.
  • तिस्ती नॅगरेम्बा, माझा मेंगिस्टी यांचाही त्यात समावेश आहे. स्टुअर्ट यांची शगी बेन ही कादंबरी पुरस्काराची दावेदार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात गेले कित्येक दिवस सुरू आहे.
  • बुकर पुरस्कार हा पन्नास हजार पौंडाचा असून तो 17 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

भारतात तीन लशी या क्लिनिकल ट्रायल:

  • करोना हे फक्त भारतातलंच नाही तर जगापुढचं आरोग्य संकट झालं आहे. अशात करोना व्हायरसचा प्रतिबंध करणाऱ्या लशींवर काम सुरु आहे.
  • भारतात तीन लशी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.
  • कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
  • तर सिरम इन्स्टिट्युटने फेज 2 B3 चाचणी पूर्ण केली आहे. सिरमने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे अशी माहितीही डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.

केंद्राची लोकसभेत माहिती- सहा सरकारी कंपन्या होणार बंद:

  • केंद्र सरकारचा स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
  • 20 केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्या युनिटमधील हिस्सा विकण्याची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर आहे.
  • तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
  • स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकार विचार करत आहे.
  • नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरनं 2016 पासून 34 कंपन्यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे.
  • यापैकी 8 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अन्य 6 कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे.
  • याव्यतिरिक्त 20 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात दिली.

माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन:

  • माजी कसोटीपटू, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी तथा एस.आर. पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • ते 87 वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.
  • सदाशिव यांचा जन्म कसबा ठाणे ( त. पन्हाळा ) येथे 10 ऑक्टोबर 1933 मध्ये सधन शेतकरी कुटुंबात झाला.
  • सदाशिव यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून छाप पाडली.
  • इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थ स्टॅपोर्डशायर, नॅन्टविच या क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दुहेरी बाजूने ठसा उमटवला.
  • 2017 मध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • डिसेंबर 1955 मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची प्रथमच निवड करण्यात आली होती.

दिनविशेष :

  • 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो.
  • निसर्ग कवी, शेतकरी, आमदार अशी ओळख असलेले प्रख्यात “ना.धों. महानोर” (नामदेव धोंडो महानोर) यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World