16 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

16 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2020)

युकेच्या पंतप्रधानानी स्वीकारलं प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचं निमंत्रण :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिलं होतं. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे निमंत्रण स्वीकारलं असून ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
 • ब्रिटननं ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी 7 परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे.
 • तर यावर्षी ब्रिटनमध्ये जी 7 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
 • बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2020)

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत कोहली दुसऱ्या स्थानी :

 • भारतीय कर्णधार विराट कोहली मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे तर चेतेश्वर पुजारा या यादीत सातव्या आणि अजिंक्य रहाणे दहाव्या स्थानावर आहे.
 • कोहली 886 गुणासह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह अव्वल स्थानी आहे.
 • न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर युवा फलंदाज मार्नस लाबुशेन, पाकिस्तानचा बाबर आजम आणि डेविड वॉर्नर हे यादीत आहेत.
 • तसेच पुजारा 766 गुणांसह सातव्या स्थानी आहे. बेन स्टोक्स जो रुट व भारताचा रहाणे हे अव्वल दहा मधील फलंदाज आहेत.
 • भारतीय जलदगती गोलंदाजीचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा आठव्या तर रविचंद्रन अश्विन दहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत पॅट कमिन्स अव्वल तर दुसऱ्या स्थानावर स्टुअर्ट ब्रॉड आणि न्यूझीलंडच्या नील वॅगनर हे आहेत.

ब्रिटनमध्ये आढळला नव्या प्रकारचा करोना विषाणू :

 • ब्रिटनमध्ये वाढणारी करोना रुग्णांची संख्या ही नवीन प्रकारच्या करोना विषाणूमुळे आहे. करोनाच्या या नव्या विषाणूमुळेच ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये पुन्हा करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याचे सांगितले जात आहे.
 • तर हा करोनाचा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा वेगळा असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बुधवारपासून लॉकडाउनचे कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत.
 • ब्रिटनमध्ये आरोग्य केंद्रांवर सोमवारपासून फाइजर/बायोएनटेकच्या करोना लसींचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. याच आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

दिनविशेष :

 • 16 डिसेंबर 1497 मध्ये वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
 • अमेरिकन राज्यक्रांती 16 डिसेंबर 1773 मध्ये बॉस्टन टी पार्टी.
 • 16 डिसेंबर 1854 मध्ये भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
 • 16 डिसेंबर 1946 मध्ये थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
 • कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर 16 डिसेंबर 1985 मध्ये राष्ट्राला समर्पित.
 • 16 डिसेंबर 1911 मध्ये पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.