15 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2018)

15 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2018)

अमिताव घोष यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड:

 • साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे.
 • साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध कादंबरीकार प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत अमिताव घोष यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. amitav-ghosh
 • द शॅडो लाईन्स, द ग्लास पॅलेस, द हंग्री टाइड या त्यांच्या गाजलेल्या कांदबऱ्या आहेत. हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या यादीत माझा समावेश होईल असे मला कधी वाटले नव्हते असे अमिताव यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
 • अमिताव यांचा कोलकातामध्ये 1956 साली एका बंगाली-हिंदू कुटुंबात जन्म झाला. सध्या अमिताव न्यूयॉर्क येथे आपल्या पत्नीसोबत राहतात. दिल्ली आणि अन्य परदेशी नामांकित विद्यापीठामधून त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये काहीवर्ष वास्तव्य केले. याआधी पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2018)

आयर्लंड संसदेकडून गर्भपाताची परवानगी:

 • आयर्लंडच्या संसदेने ऐतिहासिक निर्णय घेत प्रथमच गर्भपाताचा कायदा मंजूर केला. वर्ष 2018 च्या सुरूवातीला झालेल्या जनमत संग्रहानंतर आयर्लंडच्या संसदेने पहिल्यांदाच गर्भपाताची परवानगी दिली. हा देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी सांगितले.
 • वर्ष 2012 मध्ये वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी भारतीय दंतवैद्य सविता हलप्पनवार या महिलेचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी गर्भपाताची परवानगी नाकारल्यानंतर रक्तातील विषबाधेने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आणि मोठं आंदोलन येथे करण्यात आले होते.
 • नवीन कायद्यानुसार आता 12 आठवड्यांचा गर्भ असेल व गर्भवती महिलेच्या जीवास धोका असेल, तर तो पाडता येईल. गर्भात विकृती असतील व त्यातून गर्भच मरणार असेल, तर 28 दिवस आधी किंवा नंतर गर्भपात करता येईल. गर्भपातावर असलेली घटनात्मक बंदी उठवण्यासाठी झालेल्या सार्वमतात मे महिन्यात 66 टक्के लोकांनी बंदी उठवण्याच्या बाजूने मतदान केले होते.
 • 1980 पासून आतापर्यंत एकूण 1 लाख 70 हजार महिलांनी या बंदीमुळे शेजारच्या ब्रिटनमध्ये जाऊन गर्भपात करून घेतला आहे. आयर्लंड हा कॅथॉलिक देश असून तेथे चर्चचा प्रभाव कमी होत चालला आहे. आता माल्टा हा युरोपीय समुदायातील एकच देश असा उरला आहे, की जेथे गर्भपातावर पूर्ण बंदी आहे.

नेपाळ मध्ये भारतीय चलनातील नोटांवर बंदी:

 • भारतीय चलनातील 100 रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या सर्व नोटांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ सरकारच्या या निर्णयाचा पर्यटकांना मोठा फटका बसणार आहे.
 • नेपाळमध्ये भारतीय चलन मोठया प्रमाणात वापरले जाते. नेपाळी नागरिक आणि व्यावसायिक रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी भारतीय चलन मोठया प्रमाणावर वापरतात. Note
 • 100 रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या भारतीय नोटा जवळ बाळगू नका किंवा व्यवहारासाठी वापरु नका. 100 रुपयाच्या पुढच्या नोटांना कायदेशीर मान्यता नाही असे नेपाळचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री गोकुळ प्रसाद बासकोटा यांनी सांगितले.
 • नेपाळमध्ये भारतीय चलन स्वीकारले जात असले तरी भारतात नोटाबंदी होण्याआधी सुद्धा नेपाळमध्ये 500 आणि एक हजारच्या नोटेने व्यवहार करताना अडचणी येत होत्या. नेपाळ सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतातून मोठया संख्येने पर्यटक नेपाळमध्ये जात असतात.
 • 500 आणि एक हजार रुपयाच्या बनावट नोटा मोठया प्रमाणात नेपाळमध्ये सापडल्या होत्या. नेपाळमधूनच या नोटा भारतात आणल्या जायच्या. त्यामुळे भारतीय नोटांवर बंदी घालण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकते.

आशिया चषक 2020 चे यजमानपद पाकिस्तानकडे:

 • 2020 साली होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद आशियाई क्रिकेट परिषदेने पाकिस्तानला दिले आहे. मात्र ही स्पर्धा पाकिस्तानात होणार की युएईमध्ये हे अजुन स्पष्ट झालेले नाही.
 • बांगलादेशात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याचा निर्णय अद्याप बीसीसीआयने घेतलेला नाही.
 • ‘स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला देण्यात आलेले आहे. आता स्पर्धा कुठे भरवायची हा त्यांचा निर्णय आहे.’ आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी एका वृत्तपत्राशी बोलत असताना माहिती दिली.
 • तसेच सन 2020 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी ही स्पर्धा टी-20 स्वरुपात खेळवली जाणार आहे.

भारतीय रेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण होणार:

 • भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयलगुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या हस्ते 15 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. रशिया, चीननंतर भारतातील हे तिसरे अशाप्रकारचे विद्यापीठ आहे.
 • बडोद्यातील ‘द नॅशनल रेल्वे अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट‘ने सुरू केलेल्या या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात झाली. यात दोन पदवी अभ्यासक्रम पूर्णवेळ व निवासी असून, पहिल्या तुकडीत 20 राज्यांतील 103 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. यात 17 मुली व 86 मुले आहेत.
 • बीबीएसाठी 41, तर 62 विद्यार्थ्यांनी बीएस्सी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. वाहतूक तंत्रज्ञानासाठी बीएस्सीची व वाहतूक व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी बीबीए पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 • ‘ट्रान्सपोर्टेशन अँड सिस्टिम्स डिझाईन’, ‘ट्रान्सपोर्ट सिस्टिम्स इंजिनिअरिंग’ व ‘ट्रान्सपोर्ट पॉलिसी अँड इकॉनॉमिक्‍स’ या विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम 2019-20 मध्ये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
 • रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 421 कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी मंजूर केले आहेत. बदोद्यातील वाघोदिया तालुक्‍यातील पिपलिया गावात दहा एकरावर हे विद्यापीठ वसणार आहे. नवीन जागेसाठी गुजरात सरकारने जमीन हस्तांतरास सुरवात केली आहे.

दिनविशेष:

 • 15 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन‘ आहे.
 • नागपूरकर भोसलेंनी सन 1803 मध्ये ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला होता.
 • स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 मध्ये झाला.
 • सन 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला.
 • चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना सन 1991 मध्ये ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.