15 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
15 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2020)
पंतप्रधान मोदींचा नवा नारा- ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’:
- भारताचा आज 74 वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.
- भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- करोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो.
- 130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
- देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे.
- आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकारला रिझव्र्ह बँकेने अपेक्षित सहकार्याचा हात देऊ केला आहे:
- करोना आणि टाळेबंदीबाबतच्या पाश्र्वभूमीवर तीव्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारला रिझव्र्ह बँकेने अपेक्षित सहकार्याचा हात देऊ केला आहे.
- वित्तीय तुटीची चिंता भेडसावणाऱ्या सरकारला रिझव्र्ह बँक 57,128 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करणार आहे.
- रिझव्र्ह बँकेकडील कोटय़वधीच्या वरकड रकमेबाबत केंद्र सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही होते.
- यामुळे माजी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल तसेच माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
- केंद्र सरकारमध्ये वित्त विभागाचे सचिवपद भूषविलेल्या शक्तिकांत दास यांची मध्यवर्ती बँके च्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मात्र या मुद्दय़ावर सहकार्याचीच भूमिका आजवर घेतलेली आहे.
- त्यांच्या नेतृत्वाखाली आधीच्या वर्षांत 1.76 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. यामध्ये 1.23 लाख कोटी रुपये लाभांश व 52,637 कोटी रुपये अतिरिक्त तजविजेपोटीची रक्कम यांचा समावेश आहे.
नरेश कुमार यांनाही सातव्यांदा शौर्य पदक मिळाले:
- बाटला हाऊस चकमकीत 2008 मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
- 19 सप्टेंबर 2008 रोजी बाटला हाऊस चकमक झाली होती त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर शर्मा यांचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. बाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते.
- 2009 मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते.
- केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे.
- शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण 81 तर केंद्रीय राखीव पोलीस दलास 55 पदके जाहीर झाली आहेत.
उच्च न्यायालयाचे डॉक्टरांना आदेश प्रिस्क्रिप्शन कॅपीटल लेटर्समध्ये लिहावे:
- ओडिशा उच्च न्यायालयाने सोमवारी एका सुनावणीदरम्यान सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तसेच इतर आरोग्य शिबिरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना देण्यात येणारे औषधांचे प्रिस्क्रिप्शन कॅपीटल लेटर्समध्ये लिहावे असे आदेश दिले आहेत.
- प्रिस्क्रिप्शन वाचता येण्यासाठी ते कॅपीटल लेटरमध्ये लिहावेत असं न्यायालयाने म्हटलं आहे.
- एका अर्जदाराने पत्नीची काळजी घेण्यासाठी जामीन देण्यासंदर्भात केलेल्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान न्या. एस. के. पानीगराही यांनी हे आदेश दिले आहेत.
- हा अर्ज करताना पुरावा म्हणून या व्यक्तीने डॉक्टरांनी पत्नीच्या उपचारासाठी लिहून दिलेल्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन आणि इतर कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली.
- यावेळी न्यायालयाने या कागदपत्रांवरील अक्षर कोणत्याही समान्य माणसाला समजण्यासारखे नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
भारत बायोटेक लस सुरक्षित असल्याचा दावा:
- भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणींमध्ये लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
- देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.
- भारतातील 12 शहरांमध्ये 375 स्वयंसेवकांवर करोना लसीची चाचणी करण्यात आली.
- प्रत्येक स्वयंसेवकाला या लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
‘एमसीए’च्या बैठकीत- गावस्कर यांच्या विशेष सत्काराचा मुद्दा:
- पोर्ट ऑफ स्पेन येथे 1971मध्ये महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी केलेल्या कसोटी पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) उत्सुक आहे.
- ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेच्या 18 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीतील विषय पत्रिकेत या मुद्दय़ाचा समावेश करण्यात आला आहे.
- ‘एमसीए’ची बैठक 14 ऑगस्टला होणार होती, परंतु ती चार दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
- 6 मार्च, 2021 या दिवशी गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची आमची योजना आहे, अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली आहे.
दिनविशेष :
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.
- मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना 15 ऑगस्ट 1862 मध्ये झाली.
- पं. नेहरू 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
- 15 ऑगस्ट 1948 मध्ये दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
- 15 ऑगस्ट 1960 मध्ये कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.