14 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Yes Bank
Yes Bank

14 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 मार्च 2020)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ:

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली.
 • तर सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी महागाई भत्ता (डीए) दिला जातो. जगात केवळ भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्ता वाढविण्याची मागणी करण्यात येत होती.
 • तसेच यापूर्वीच केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी राज्यसभेमध्ये लेखी उत्तरात मार्च महिन्याच्या पगारापासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता मिळायला सुरुवात होईल, असे स्पष्ट केले होते.
 • भारतात 1972 मध्ये मुंबईतील कपडा उद्योगात सर्वप्रथम महागाई भत्त्याची सुरुवात झाली. यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यायला सुरुवात केली होती. वाढत्या महागाईचा ताण सरकारी कर्मचाऱ्यांवर पडून नये हा यामगचा उद्देश होता.
 • ऑल इंडिया सर्व्हिस अॅक्ट 1951 अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देता यावा यासाठी 1972 मध्येच हा कायदा तयार करण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मार्च 2020)

Yes Bankला मोदी सरकारचा मोठा आधार :

 • गेल्या अनेक दिवसांपासून संकटात सापडलेल्या YES BANKला पुन्हा उभारी देण्यासाठी SBI मदतीचा हात देणार आहे.
 • तर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून Yes Bankला 7250 कोटी रुपये देण्यास मोदींच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
 • एसबीआय आणि केंद्रीय बोर्ड कार्यकारी समितीची 11 मार्चला एक बैठक झाली होती. त्या बैठकीत 10 रुपये प्रतिदरानं येस बँकेचे 725 कोटींचे समभाग विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावालाच आता मोदींच्या कॅबिनेटनं हिरवा कंदील दाखवला आहे.
 • तसेच या करारानंतरही येस बँकेतलीएसबीआयची भागीदारी 49 टक्क्यांच्या वर जाणार नाही. Yes Bankला पुनर्जीवित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून गेल्या आठवड्यात एका प्लॅनचीही घोषणा करण्यात आली होती.
 • तर या योजनेनुसार पुनर्रचित येस बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांना सध्याच्या वेतनश्रेणीवर पगार मिळेल. ही व्यवस्था पुढील 1 वर्ष कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध राहील. पुनर्रचित बँकेचे अधिकृत भांडवल बदलून 5 हजार कोटी रुपये केले जाईल. तसेच प्रति शेअर 2 रुपये दराने 24 हजार कोटी रुपयांच्या इक्विटी शेअरमध्येही बदल केला जाणार आहे. यानंतर ही रक्कम 48 हजार कोटी रुपये होईल.
 • नवीन बँकेत गुंतवणूक करणारी बँक आपली भागीदारी 26 टक्क्यांपेक्षा कमी करणार नाही. गुंतवणूक केलेल्या तारखेपासून पुढील 3 वर्षे हे अनिवार्य असेल. पुनर्गठित नवीन बँकेच्या इक्विटीमध्ये 49 टक्के गुंतवणूक होईपर्यंत गुंतवणूकदार बँक आपलं भागभांडवल वाढवू शकते. यासाठी प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त नसावी.
 • तसेच प्रति फेस व्हॅल्यू 2 रुपये आणि प्रीमियम किंमत जास्त असू नये. पुनर्गठित बँकेसाठी नवीन बोर्ड स्थापन केले जाईल. या योजनेत प्रस्तावित आहे की, पुनर्गठित बँकेच्या संचालक मंडळाला हे ठरविण्याची परवानगी देण्यात येईल की मुख्य व्यवस्थापकीय कर्मचा-यांनी घेतलेला निर्णय योग्य प्रक्रियेखाली उलट केला जाऊ शकतो. नवीन मंडळाकडे गुंतवणूकदार बँकेचे 2 नामनिर्देशक असतील. आरबीआय अतिरिक्त संचालकांची नेमणूक देखील करू शकते.
 • नवीन संचालक जोडण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळावर अवलंबून असेल. पुनर्रचित बँक नवीन
  कार्यालये आणि शाखा उघडण्याचा किंवा विद्यमान शाखा व कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेईल. हे निर्णय केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियमांतर्गत घेतले जातील.

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा :

 • बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचं असल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं.
 • तर बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायचं आहे, त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत.
 • परंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.
 • बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या 12 झाली आहे. यामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचाही समावेश आहे.

सार्क देशांना संयुक्त रणनीतीचा मोदी यांचा प्रस्ताव :

 • करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सार्क देशांनी संयुक्त रणनीती आखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रस्तावित केले. त्याला नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या सदस्य देशांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि करोनाचा संयुक्तपणे मुकाबला करण्यासाठी मोदी यांनी ठेवलेल्या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले.
 • सार्क सदस्य देशांनी जगासमोर एक उदाहरण ठेवण्याचे आवाहन करताना मोदी यांनी, रणनीती ठरविण्यासाठी सदस्य देशांच्या नेत्यांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचेही प्रस्तावित केले. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी मोदी यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.

IPL पुढे ढकलली, आता 15 एप्रिल रोजी होणार सुरू :

 • करोना व्हायरसच्या भितीच्या सावटामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल 29 मार्च रोजी सुरू होणार होती परंतु आता ती 15 एप्रिल रोजी सुरू असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तशी कल्पना सगळ्या संघांच्या मालकांना देण्यात आली आहे.
 • जगभरातील 110 पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला असून भारतामध्येही 80 जणांना लागण झाल्याचे आढळले आहे. सर्व पातळींवर करोनाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा वातावरणात आयपीएल भरवणे धोक्याचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनविशेष:

 • सन 1931 या वर्षी पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
 • ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म सन 1931 मध्ये झाला होता.
 • सन 1954 मध्ये दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
 • सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी सन 2001 मध्ये भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली होती.
 • सन 2010 मध्ये ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मार्च 2020)

You might also like
1 Comment
 1. Amol Tamhane says

  Give me mpsc notes

Leave A Reply

Your email address will not be published.