14 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs
14 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 जानेवारी 2022)
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धात मालविकाचा सायनावर विजय :
- नागपूरची उदयोन्मुख बॅडिमटनपटू मालविका बनसोडने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत गुरुवारी सायना नेहवालवर सनसनाटी विजय मिळवला.
- तसेच मालविकासह ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
- तर 20 वर्षीय मालविकाविरुद्धच्या लढतीत सायनाने 17-21, 9-21 अशी हार पत्करली.
- जागतिक क्रमवारीत 111व्या क्रमांकावरील मालविकाने फक्त 34 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात आणले.
भारत-चीनदरम्यान आता पुन्हा चर्चा :
- भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यानच्या चर्चेची चौदावी फेरी निर्णायक ठरली नाही.
- तर उर्वरित मुद्दय़ांबाबत ‘परस्परमान्य तोडगा काढण्यासाठी’ लष्करी व राजनैतिक माध्यमातून संवाद सुरू ठेवण्याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.
- सीमाविषयक चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर व्हावी याबद्दल आपले मतैक्य झाले असल्याचे दोन्ही देशांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले.
- पूर्व लडाखमधील पॅट्रोलिंग पॉइंट 15 (हॉट स्प्रिंग्ज) येथून सैन्य माघारी घेण्याशी संबंधित मुद्दय़ांचे चर्चेच्या 15व्या फेरीत निराकरण करण्याबाबत भारत आशावादी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले होते.
Must Read (नक्की वाचा):
संक्रांतीनिमित्त सूर्यनमस्कार कार्यक्रमाचं आयोजन :
- 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्ताने एक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे.
- तर या कार्यक्रमात 1 कोटींपेक्षा जास्त लोक योगासन करताना दिसतील, अशी आशा आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली आहे.
- ‘आझादी का अमृत महोत्सव’उत्सवांतर्गत 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालयाने सर्व तयारी केली आहे, असे ते म्हणाले.
- भारतीय योग संघटना, राष्ट्रीय योग क्रीडा महासंघ, योग प्रमाणन मंडळ, एफआयटी इंडिया यासारख्या भारतातील आणि परदेशातील आघाडीच्या योग संस्थांनी, इतर सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांनी या जागतिक कार्यक्रमात भाग घेणे अपेक्षित आहे.
- दरम्यान, सहभागी आणि योग उत्साही लोक संबंधित पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात आणि त्यांना 14 जानेवारी रोजी सूर्यनमस्कार करतानाचे व्हिडिओ अपलोड करावे लागतील.
योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार :
- भाजपा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत आहे.
- दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार यावरही चर्चा झाली.
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून लढले तर संपूर्ण राज्यात हिंदुत्वाचा संदेश जाईल, पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.
- मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
दिनविशेष:
- भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव व्दारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी झाला होता.
- सन 1923 मध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 मध्ये झाला.
- लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र 14 जानेवारी 1948 मध्ये सुरू झाले.
- सन 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.