14 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
14 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2019)
ऐश्वर्या ठरली ‘मोटरस्पोर्ट्स’मध्ये विश्वविजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय :
- मोटरस्पोर्ट्स या खेळामध्ये भारताकडून खेळणारे खेळाडू फार कमीच दिसतात. तशातच 23 वर्षीय ऐश्वर्या पिसे हिने या क्रीडा प्रकारात विश्वविजेतेपद जिंकून इतिहास रचला आणि भारताची मान उंचावली. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- ऐश्वर्याने दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत बाजी मारली होती. त्यानंतर पोर्तुगालमध्ये झालेल्या फेरीत तिने तिसरे स्थान पटकावले होते. तसेच, ती स्पेनमधील फेरीत पाचव्या, तर हंगेरीत चौथ्या क्रमांकावर होती. तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर तिने एकूण 65 गुण कमावले आणि तिने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
- तर पोर्तुगालची रिटा हिने 61 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. ज्युनियर गटात ऐश्वर्याला 46 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
Must Read (नक्की वाचा):
Whatsappच्या ‘या’ नवीन फीचरमध्ये येणार फिंगरप्रिंट लॉक :
- व्हॅाट्सअॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअॅप बीटामध्ये फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे.
- तर या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे.
- तसेच व्हॅाट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॅाट्सअॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन ‘ऑथेंटिकेशन’ चे नवीन ऑप्शन उपलब्ध
होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करु शकणार आहे. - अँड्रॉइड बीटापूर्वी व्हॉट्सअॅपने हे फिचर्स आयओएसला उपलब्ध करुन दिले. त्याचप्रमाणे तीन महिन्यानंतर आयओएस युजर्संना व्हॅाट्सअॅप सुरक्षितेसाठी फेस आयडी व टच आयडीची सुविधा उपलब्ध करुन दिली होती.
- तसेच व्हॅाट्सअॅपचे कोणतेही नवीन फीचर्स येणार असेल तर ते सर्वात प्रथम अँड्रॉइड युजर्सला उपलब्ध केला जातो. त्यानंतर आयओएस यूजर्सला ते फीचर्स दिले जाते, त्यामुळे आयओएसला प्रथम कोणतेही नवीन फीचर्स उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेत परतणार :
- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा राज्यसभेत परतणार आहेत.
- राजस्थानमध्ये एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता डॉ. सिंग हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
- डॉ. सिंग यांनी 1991 ते 2019 अशी 28 वर्षे आसाममधून राज्यसभेचे सदस्यत्व केले होते. जून महिन्यात त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आली. आसाम विधानसभेत काँग्रेसकडे पुरेशी मते नसल्याने डॉ. सिंग यांचा
राज्यसभेचा मार्ग बंद झाला होता. - तर डॉ. सिंग यांच्यासारखे नेते राज्यसभेत आवश्यक असल्याने काँग्रेसने तमिळनाडूतून डॉ. सिंग यांना निवडून आणण्याची योजना आखली होती. याच दरम्यान राजस्थान भाजप अध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनाने राजस्थानमध्ये एक जागा रिक्त झाली होती.
- तसेच 200 सदस्यीय राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे 100 आमदार असून, अपक्ष आणि बसपाचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यामुळे डॉ. सिंग यांना निवडून येण्यात काही अडचण येणार नाही.
दिनविशेष :
- 14 ऑगस्ट हा ‘संस्कृत दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन 1943 मध्ये सन्माननीय डी.लिट. पदवी दिली.
- लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून 14 ऑगस्ट 1947 रोजी नेमणूक झाली होती.
- सन 1958 मध्ये एअर इंडियाची दिल्ली-मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
It’s really good service
I LIKE MOMENTS.